उल्हासनगरात १ कोटीच्या पेट्रोलियम पदार्थाची विक्री, टँकर चालकासह ७ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 06:20 PM2022-01-20T18:20:52+5:302022-01-20T18:22:39+5:30
Crime News : अधिक तपास ठाणे खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा करीत असून मोठे घबाड उघड होण्याची शक्यता पोलीस व्यक्त करीत आहेत.
सदानंद नाईक
उल्हासनगर : पेट्रोलजन्य पदार्थाची वाहतूक करणाऱ्या टँकरवरील चालक व क्लिनर यांनी आपापसात संगनमत करून १ कोटी पेक्षा जास्त किमंतीचे टँकरमधील ज्वलनशील पदार्थ चोरून व साठा करून वाहतूक केल्या प्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने सात जणांवर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक तपास ठाणे खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा करीत असून मोठे घबाड उघड होण्याची शक्यता पोलीस व्यक्त करीत आहेत.
उल्हासनगर मधील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलियामजन्य पदार्थाची वाहतूक करणाऱ्या टँकर वरील चालक व क्लिनर यांनी संगनमत करून त्यांच्या ताब्यातील टँकरमधून पेट्रोलियांजन्य पदार्थ (कच्चा माल) बेस ऑइल नं १५० हा ज्वलनशील पदार्थ तो धोकादायक व जीवितास धोका उत्पन्न होईल. हे माहीत असतांना व ज्वलनशील पदार्थाचा साठा करण्याचा पेट्रोलियम अँड सेफ्टी ऑर्गनाजेशनचा कोणताही परवानगी नसतांना त्याचा साठा मलंगवाडी येथील एका धाब्या शेजारी केला. ज्वलनशील पदार्थाने भरलेल्या टँकरचे सील तोडून, टँकर मधील ज्वलनशील पदार्थाची चोरी करून त्याची बेपर्वाईने वाहतूक करून संबंधित कंपनीची फसवणूक करीत असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाला मिळल्यावर पथकाने टँकरच्या चालक-क्लिनरसह ७ जणांवर१ कोटी पेक्षा जास्त किमतीची संबंधित कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
हिललाईन पोलीस ठाण्यात ठाणे खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखेचे कर्मचारी संजय बाबर यांच्या फिर्यादीवरून शिवपूरन वर्मा, अमन सरोज, संजय सिंग, प्रयागसिंग उर्फ रविसिंग श्रीगणेश सिंग, अमर बहादूर वर्मा, संदीप वर्मा व विसावा धब्याचे मालक अनिल चिकणकर अश्या ७ जनावर गुन्हे दाखल केले. याप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथक चौकशी करीत असून यामधून मोठे घबाड व गुन्हे उघड होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.