Remdesivir Blackmarket: बारामतीतील प्रकार! रेमडेसिविरच्या बाटल्यांमध्ये पॅरासिटीमोल भरून विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 05:21 AM2021-04-18T05:21:56+5:302021-04-18T05:22:59+5:30
Remdesivir shortage: रेमडेसिविरच्या तुटवड्याचा फायदा उचलत मोकळ्या झालेल्या रेमडेसिविरच्या बाटल्यांमध्ये लिक्विड पॅरासिटीमोल भरून ३५ हजार रुपयांना एक इंजेक्शन विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती (पुणे) : रेमडेसिविरच्या तुटवड्याचा फायदा उचलत मोकळ्या झालेल्या रेमडेसिविरच्या बाटल्यांमध्ये लिक्विड पॅरासिटीमोल भरून ३५ हजार रुपयांना एक इंजेक्शन विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. येथील पेन्सिल चौकात शुक्रवारी मध्यरात्री बारामती ग्रामीण पोलिसांनी चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
बारामतीतील कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याचा यात सहभाग आहे. प्रकरणी मुख्य सूत्रधार दिलीप ज्ञानदेव गायकवाड (३५, रा. काटेवाडी), प्रशांत सिद्धेश्वर घरत (२३, रा. भवानीनगर), संदीप संजय गायकवाड (रा. भिगवण), शंकर दादा भिसे (२२, रा. काटेवाडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपीने ३५ हजार रुपयांना एक इंजेक्शन मिळेल. तुम्ही पेन्सिल चौकामध्ये या, असे सांगितले. आरोपी प्रशांत घरत व शंकर भिसे पांढऱ्या रंगाच्या कारमधून आले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.
रेमडेसिविर विकणारे सख्खे भाऊ अटकेत
nरेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या दोघा भावांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन इंजेक्शन आणि दुचाकी जप्त कली आहे.
nप्रदीप देवदत्त लाटे (वय २५) आणि संदीप देवदत्त लाटे (२३, रा. बालेवाडी, मूळ रा. बेलुरा,जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बालेवाडी भागात ही कारवाई करण्यात आली.
बीडमध्ये चौकशी
बीड : औरंगाबादमध्ये रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले होते. याचे कनेक्शन बीडपर्यंत पोहोचले आहे. पोलीस पथकाने मेडिकल चालकाला उचलून चौकशीसाठी औरंगाबादला नेल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.