Salman Khan: सलमानला विमानतळावर रोखणारा जवान अडचणीत; माध्यमांशी संवाद साधल्याने कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 09:02 AM2021-08-24T09:02:13+5:302021-08-24T09:04:40+5:30

Somnath Mohanti in Trouble after he stops Salman khan on Airport: अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ आगामी टायगर ३ सिनेमाच्या चित्रीकरणासाठी रशियाला रवाना होत होते. गर्दीतून वाट काढत तो आत प्रवेश करणार इतक्यात तेथे तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाने त्याला रोखले.

Salman Khan: Jawan who stopped Salman at the airport in trouble; Action on interacting with the media | Salman Khan: सलमानला विमानतळावर रोखणारा जवान अडचणीत; माध्यमांशी संवाद साधल्याने कारवाई

Salman Khan: सलमानला विमानतळावर रोखणारा जवान अडचणीत; माध्यमांशी संवाद साधल्याने कारवाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभिनेता सलमान खानलाविमानतळावर रोखणारा जवान अडचणीत सापडला आहे. या प्रकारानंतर माध्यमांशी संवाद साधल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सोमनाथ मोहंती असे या जवानाचे नाव आहे.

अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ आगामी टायगर ३ सिनेमाच्या चित्रीकरणासाठी रशियाला रवाना होत होते. शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास सलमान मुंबई विमानतळाच्या प्रवेशद्वारावर दाखल होताच चाहत्यांनी त्याला घेरले. या गर्दीतून वाट काढत तो आत प्रवेश करणार इतक्यात तेथे तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाने त्याला रोखले.

सुरक्षा तपासणी पूर्ण केल्याशिवाय आपण आत जाऊ शकत नाही,  असे त्याने सलमानला ठणकावून सांगितले. त्यामुळे तिथे उपस्थित असलेले सगळेच अवाक् झाले. सलमाननेही आढेवेढे न घेता त्याच्या सूचनांचे पालन केले. याबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर सर्वदूर होताच नेटकऱ्यांनी त्या सीआयएसएफ जवानाच्या धाडसाचे कौतुक केले.

नियमांचा भंग
या प्रकाराबद्दल माध्यमांमध्ये भाष्य केल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ओडिशातील वृत्तवाहिनीने त्याच्याशी संपर्क साधला होता.

Web Title: Salman Khan: Jawan who stopped Salman at the airport in trouble; Action on interacting with the media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.