सलमान खानने मुंबई पोलीस आयुक्तांची घेतली भेट, मूसेवालाच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून मिळाल्या धमक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 05:49 PM2022-07-22T17:49:18+5:302022-07-22T18:00:23+5:30

Salman Khan : आता नुकतीच सलमान खानने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली आहे.

Salman Khan Meets Mumbai Police Commissioner, Threats Received From Lawrence Bishnoi Gang After Mooswala's Murder | सलमान खानने मुंबई पोलीस आयुक्तांची घेतली भेट, मूसेवालाच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून मिळाल्या धमक्या

सलमान खानने मुंबई पोलीस आयुक्तांची घेतली भेट, मूसेवालाच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून मिळाल्या धमक्या

googlenewsNext

सलमान खानला यापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या, त्यानंतर मुंबई पोलीस दलाने कंबर कसली होती. पोलिसांनीही अभिनेत्याच्या घरी जाऊन चौकशी केली. सलमान खानला मिळालेल्या धमकीमध्ये त्यालाही सिद्धू मुसेवालाप्रमाणे मारून टाकले जाईल, असे म्हटले होते. तेव्हापासून सलमान खानच्या जीवाला धोका आहे.

सलमानने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली
आता नुकतीच सलमान खानने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली आहे. काही वेळापूर्वी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात भेटून सलमान निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी सलमान खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले होते. वांद्रे येथील बँडस्टँड प्रोमेनेड येथे हे पत्र सापडले. सलमानचे वडील सलीम खान मॉर्निंग वॉकनंतर ज्या ठिकाणी बसायला गेले तिथे सलीम खानच्या गार्डला हे पत्र सापडले. या संदर्भात अभिनेत्याने पोलिस आयुक्तांची भेट घेतली.

धमकीच्या पत्रानंतर सलमान खानने पोलिसांना एकअर्ज सादर केला, ज्यामध्ये त्याने शस्त्रास्त्रासाठी परवाना देण्याची मागणी केली होती. आपल्या सुरक्षेसाठी या शस्त्र परवान्यासाठी पोलिसांकडे अर्ज करायचा असल्याचे त्याने सांगितले. याबाबत सलमान खानने पोलीस आयुक्तांशीही चर्चा केली आहे. मात्र, सलमान आणि पोलीस आयुक्त यांच्यात नेमके काय झाले, याबाबत अद्याप काहीही सांगता येणार नाही.

 

Web Title: Salman Khan Meets Mumbai Police Commissioner, Threats Received From Lawrence Bishnoi Gang After Mooswala's Murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.