सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलीस जबाब नोंदवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 06:38 PM2022-06-06T18:38:01+5:302022-06-06T18:43:48+5:30
Salman Khan : मुंबई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आले आहे.
सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकी मिळाल्याप्रकरणी मोठी माहिती समोर येत आहे. ५ जून रोजी सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या नावाने धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर मुंबईपोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आले आहे.
पोलिसांनी जबाब नोंदवले
पोलिसांशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, धमकी प्रकरणी चार जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यात सलमानचे वडील आणि गीतकार सलीम खान यांचाही समावेश आहे. पोलीस आज सलमान खानचा जबाब नोंदवणार आहेत.
सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र, लॉरेन्स बिश्नोईची कसून चौकशी
पोलीस काय शोधत आहेत?
वांद्रे बॅंडस्टँडजवळील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यात पोलीस गुंतले असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांना अद्याप ठोस काहीही मिळालेले नाही. धमकीच्या पत्रात G B L B लिहिले होते. याचा अर्थ गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई, मुंबई पोलीस सध्या याचा तपास करत आहेत. महाराष्ट्रात या दोघांच्या टोळीतील सदस्यांचा तपशील पोलिसांकडून शोधण्यात येत आहे.
सलमान खानला धमक्या मिळाल्यानंतर मुंबई पोलीस पूर्ण अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. कडक कारवाई करत पोलिसांनी सलमानच्या घरातील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा वाढवली आहे. मुंबई पोलिसांचे एक पथक 6 जून रोजी सकाळी सलमान खानच्या घरातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचले. याठिकाणी मुंबईचे पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि डीसीपी मंजुनाथ सिंगे यांनीही सलमानच्या कुटुंबीयांची आणि इतरांची चौकशी केली.
पोलिसांनंतर सलमान खानचे दोन्ही भाऊ सोहेल खान आणि अरबाज खान त्याला भेटायला आले होते. दोघेही गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर दिसले. सलमान आणि सलीम खान यांना मिळालेल्या धमक्यांमुळे संपूर्ण खान कुटुंब नाराज आणि तणावाखाली आहे.
सलीम खान आणि सलमानला धमक्या आल्या
५ जून रोजी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र आले होते. हे पत्र मुंबईतील वांद्रे येथील बँडस्टँड प्रोमेनेड येथे सलीम आणि त्याच्या अंगरक्षकांना मिळाले होते. सलीम रोज सकाळी आपल्या अंगरक्षकासोबत मॉर्निंग वॉकसाठी जातात. फिरल्यानंतर त्यांची बसण्याची जागा निश्चित केली जाते. चालल्यानंतर सलीम खान बसलेल्या बेंचवर हे पत्र त्यांच्या अंगरक्षकाला दिसले.
सलीम आणि सलमान खान यांची अवस्था सिद्धू मूसवालासारखी होईल, असे धमकीवजा पत्रात लिहिले होते. यानंतर सलीम यांनी पोलिसात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाबद्दल सांगायचे तर, गेल्या महिन्यात पंजाबमधील मानसा येथील जवाहरके गावाजवळ त्यांचे निधन झाले. मुसेवाला यांची काही अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.