सलमान खानच्या चित्रपटाचं तिकिट काढून दिलं नाही, आरोपीनं एकाच्या पोटात खुपसला चाकू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 03:25 PM2021-12-01T15:25:35+5:302021-12-01T15:27:05+5:30

Stabbing Case : पोलिसांनी आरोपी सय्यद झियाउद्दीनला घटनास्थळावरून अटक केली आहे. त्याच्याकडून पीडितेची पर्स आणि रक्ताने माखलेला चाकू जप्त केला.

Salman Khan's movie ticket was not canceled, the accused stabbed one in the stomach | सलमान खानच्या चित्रपटाचं तिकिट काढून दिलं नाही, आरोपीनं एकाच्या पोटात खुपसला चाकू

सलमान खानच्या चित्रपटाचं तिकिट काढून दिलं नाही, आरोपीनं एकाच्या पोटात खुपसला चाकू

Next

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या 'अंतिम' या चित्रपटाचे तिकीट खरेदी करण्यास नकार दिल्याने एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर चाकूने वार करून जखमी केले. ही घटना दिल्लीच्या मध्य जिल्ह्यातील चांदनी महल पोलीस स्टेशन परिसरातील आहे. पोलिसांनी आरोपी सय्यद झियाउद्दीनला घटनास्थळावरून अटक केली आहे. त्याच्याकडून पीडितेची पर्स आणि रक्ताने माखलेला चाकू जप्त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण डिलाईट सिनेमा हॉलमध्ये सलमान खानचा 'अंतिम' सिनेमा पाहण्यासाठी आला होता. त्यानंतर सय्यद जियाउद्दीनही तेथे पोहोचला आणि त्याने त्या तरुणाला सांगितले की, त्याच्यासाठीही तिकीट काढ. त्याने तिकीट खरेदी करण्यास नकार देताच आरोपीने त्याच्यावर चाकूने हल्ला करून त्याची पर्स हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला.

ही खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी ७.१५ च्या सुमारास घडली. अजय नावाचा तरुण सलमान खानचा 'अंतिम' सिनेमा पाहण्यासाठी डिलाइट सिनेमा हॉलमध्ये पोहोचला होता. त्यानंतर सय्यद झियाउद्दीन अजयकडे पोहोचला. सय्यद झियाउद्दीनने सिनेमा हॉलच्या बाहेर असलेल्या अजयला त्याच्यासाठीही सिनेमाचं तिकीट खरेदी करायला सांगितलं.

यानंतर अजयने त्याच्यासाठी तिकीट घेण्यास नकार दिला. यानंतर सय्यदने अजयच्या कमरेवर चाकूने वार करून त्याची पर्स लंपास केली आणि त्याच्या पाठलाग केल्यास पोटात वार कारेन, अशी धमकी दिली. नंतर आरोपीने पळ काढला. तेव्हा आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनी चोर-चोर म्हणत आरडाओरडा सुरू केला.



त्याचवेळी दिल्ली पोलिसांचा एक जवान गस्त घालत असताना त्या भागात पोहोचला आणि आवाज ऐकून तोही चोराच्या मागे धावला आणि त्याला जागीच पकडले. सय्यद जियाउद्दीनकडून लुटलेली अजयची पर्स आणि सय्यदने अजयवर हल्ला केलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला.



पोलिसांचे म्हणणे आहे की, तपासात सय्यद जियाउद्दीन हा गुंड असल्याचे आढळून आले असून त्याच्यावर दरोडा आणि सोनसाखळी चोरीचे सुमारे २६ गुन्हे दाखल आहेत. ५ वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर काही दिवसांपूर्वी तो जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता.

Web Title: Salman Khan's movie ticket was not canceled, the accused stabbed one in the stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.