दिल्लीत पुन्हा तेच... श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती, लिव्ह-इन पार्टनरची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 06:36 IST2023-02-15T06:35:32+5:302023-02-15T06:36:14+5:30
फ्रीजमध्ये ठेवला मृतदेह, शहारे आणणारी घटना

दिल्लीत पुन्हा तेच... श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती, लिव्ह-इन पार्टनरची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतश्रद्धा वालकर हत्येची पुनरावृत्ती आणि तिही ‘व्हॅलेंटाइन वीक’ सुरू असतानाच झाल्याने खळबळ उडाली आहे. नजफगढमधील मित्रांव गावाबाहेरील ढाब्यावर लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवण्यात आला. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
निक्की यादव (२२) असे मृत तरुणीचे नाव असून, तिचा प्रियकर साहिल गेहलोत (२६) याने ९ आणि १० फेब्रुवारीच्या मध्यरात्री तिचा गळा दाबून खून केला. मृतदेह लपवला ताे धाबा त्याचा असून निक्कीने लग्नाचा हट्ट धरल्याने तिची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. हत्या केल्यानंतर त्याने त्याच दिवशी दुसऱ्या तरुणीशी लग्न केले.