वांद्र्यासारखा प्रकार : परप्रांतीय मजुरांना भडकविण्याचा प्रयत्न; दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 09:05 PM2020-04-15T21:05:57+5:302020-04-15T21:08:02+5:30
यावेळी शासनाच्या जमावबंदीचा आदेश झुगारून पाच पेक्षा जास्त कामगारांना एकत्र केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल
पनवेल : वांद्रे प्रकरणाशी साधर्म्य प्रकार कामोठेत देखील घडल्याने कामोठे पोलिसांनी स्वयंघोषित समाजसेवक कमलेश दुबे (26) व महम्मद अन्सारी (45) या इसमांना
बुधवारी अटक केली आहे.
मंगळवारी या आरोपींनी परप्रांतीय मजुरांना पुरेसे अन्न ,धान्य मिळत नाही,मजुरांना मोठे हाल सहन करावे लागत असुन परप्रांतीय मजुरांच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या इसमांना अटक करण्यात आली आहे.यावेळी शासनाच्या जमावबंदीचा आदेश झुगारून पाच पेक्षा जास्त कामगारांना एकत्र केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे आरोपींच्या मार्फत मजुरांच्या भावना भडकविणा-या वादग्रस्त चित्रफीत व्हायरल करून शासनाविरोधात मजुरांना भडकवित शांतता भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या आदेशाने कामोठ्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब तुपे यांनी दाखल केलाआहे .