संजय दत्तला AK-56 देणारा समीर हिंगोरा अन् माहीम दर्ग्याचे ट्रस्टी रडारवर, NIAची D कंपनीवर मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 05:23 PM2022-05-09T17:23:44+5:302022-05-09T17:27:11+5:30
NIA Action on D company : या प्रकरणी टाडा न्यायालयाचे तत्कालीन न्या. प्रमोद कोदे यांनी समीर हिंगोरा याला 9 वर्षांची शिक्षाही सुनावली होती. समीर हिंगोरा हा व्यवसायाने चित्रपट निर्माता आहे.
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात आज सकाळपासून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या जवळपास 20 ठिकाणी NIA टीम छापे टाकत आहे. या छाप्यात समीर हिंगोरा याचे नाव समोर आले आहे. सध्या NIAने समीर हिंगोरा याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. समीर हिंगोरा हा तो व्यक्ती आहे, ज्याने बॉलीवूडच्या मुन्ना भाई संजय दत्तला AK-56 रायफल दिली होती. संजय दत्तला शस्त्रे देण्यात या व्यक्तीची महत्त्वाची भूमिका होती. संजय दत्तला समीर हिंगोरा याच्या वाहनातून AK-56 पाठवण्यात आली होती. या प्रकरणी टाडा न्यायालयाचे तत्कालीन न्या. प्रमोद कोदे यांनी समीर हिंगोरा याला 9 वर्षांची शिक्षाही सुनावली होती. समीर हिंगोरा हा व्यवसायाने चित्रपट निर्माता आहे.
चित्रपट अभिनेता संजय दत्त हा देखील १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी होता. त्याला टाडा न्यायालयाने शिक्षाही सुनावली होती. नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सध्या संजय दत्तची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर तुरुंगातून सुटका झाली आहे.
Several Hawala operators & drug peddlers were associated with Dawood & NIA had registered in this regard in February. Raids began today: National Investigation Agency (NIA)
— ANI (@ANI) May 9, 2022
माहीम दर्ग्याचे विश्वस्तही रडारवर
एनआयएने आज पहाटे मुंबईतील सुप्रसिद्ध माहीम दर्गा आणि हाजी अली दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवानी यांच्या घरावर छापे टाकले. मिळालेल्या माहितीनुसार, NIA अधिकारी अजूनही सोहेल खंडवानी यांची त्यांच्या घरी चौकशी करत आहेत. एनआयएने या प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा खास व्यक्ती छोटा शकीलच्या मेहुणीचा पती सलीम फ्रुट यालाही ताब्यात घेतले आहे. एनआयएचे अधिकारीही सलीम फ्रूटची चौकशी करण्यात गुंतले आहेत.
छोटा शकीलचा साथीदार सलीम फ्रूटला NIAने घेतले ताब्यात
20 ठिकाणी छापे टाकले
एनआयएची ही छापेमारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. तपास यंत्रणेने नागपाडा, भेंडीबाजार, मुंब्रा, भिवंडी, गोरेगाव, बोरिवली सांताक्रूझ आणि मुंबईतील इतर ठिकाणी छापे टाकले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएच्या छाप्यादरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत. एनआयएने मुंबईतील भेंडी बाजार परिसरातून छोटा शकीलसह सलीम कुरेशी आणि सलीम फ्रुटला ताब्यात घेतले आहे.