Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कार उलटून सहा जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 10:34 AM2023-03-12T10:34:56+5:302023-03-12T10:37:49+5:30

७ जण जखमी: रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास झाला अपघात

Samruddhi Mahamarg Accident: Terrible accident on Samruddhi Highway; Six people died in a car overturn in Buldhana, peoples from Chatrapati sambhajinagar | Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कार उलटून सहा जणांचा मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कार उलटून सहा जणांचा मृत्यू

googlenewsNext

निलेश जोशी
मेहकर: समृद्धी महामार्गावर मेहकर-सिंदखेड राजा दरम्यान लोणार तालुक्यातील शिवणी पिसा नजीक इर्टिगा गाडीला अपघात होऊन सहा जण ठार झाले तर सहा जण जखमी झाले आहेत. बहुतांश जखमी हे छत्रपती संभाजीनगर शहरातील एन ११ मधील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे.

हा अपघात रविवारी सकाळी लोणार तालुक्यातील शिवणी पिसा ते दुसरबीड दरम्यान घडला. भरधाव वेगातील इर्टिगा गाडी ही रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरमध्ये घुसली व तीन ते चार पलट्या मारून दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर उलटली. या अपघातामध्ये चार जण घटनास्थळीच ठार झाले तर दोन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघातातील जखमींना प्रथम मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. अपघातातील गंभीर जखमींना आता तेथून अन्यत्र हलविण्यात येत आहे. मृतकांची नावे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत परंतू नागपूरकडून ही कार छत्रपती संभाजीनगरच्या दिशने जात होती. या वाहनामध्ये जवळपास १३ जण होते, अशी माहिती आहे. यात काही लहान मुलांचाही समावेश होता.

Web Title: Samruddhi Mahamarg Accident: Terrible accident on Samruddhi Highway; Six people died in a car overturn in Buldhana, peoples from Chatrapati sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.