एनसीबीच्या टार्गेटवर आता सॅमचा बॉस !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 06:02 AM2020-09-20T06:02:12+5:302020-09-20T06:02:26+5:30
ड्रग अंकल म्हणून परिचित : हाय प्रोफाइल नावे पुढे येण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या तपासातून बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन उघड झाल्यानंतर नार्काेटिक्स कंट्रोल बोर्डचा (एनसीबी) तपास आता या क्षेत्रात बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. शुक्रवारी अटक केलेला तस्कर राहिल विश्राम हा बॉलिवूडमधील या बॉसच्या सूचनेनुसार अमली पदार्थांची डिलिव्हरी करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पथकाकडून आता त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, तस्कर राहिल विश्राम हा चित्रपटसृष्टीत सॅम ड्रग अंकल म्हणून ओळखला जात होता. या नावाने त्याच्याकडे मालाची मागणी केली जात असे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
राहिलकडे केलेल्या चौकशीतून या नशाबाजीमध्ये गुंतलेल्या अनेक हाय प्रोफाइल सेलिब्रिटींची नावे समोर येण्याची शक्यता आहे. राहिल हा बॉस या नावाने बॉलिवूडमध्ये ओळखल्या जाणाºया व्यक्तीच्या सांगण्यावरून ड्रग्ज संबंधित व्यक्तींना पुरवित असे. त्याचा चित्रपटसृष्टीशी थेट संबंध असून तो अभिनेता, दिग्दर्शक किंवा निर्माता यापैकी कोणीही असू शकतो. त्याबाबत अधिक माहिती घेण्यात येत असल्याचे सूत्राने सांगितले.
बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्र वर्ती यांच्या अटकेनंतर राहिल विश्वास याच्यावरील कारवाई मोठी मानली जाते. सॅम ड्रग अंकल म्हणून ओळखल्या जाणाºया राहिलकडून अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर येणार आहेत.
‘त्या’ पार्टीच्या व्हिडीओची सत्यता पडताळणार
करण जोहरच्या पार्टीच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत अमली पदार्थांचा वापर करण्यात आला होता की नाही, याची चौकशीही एनसीबीकडून सविस्तरपणे करण्यात येणार आहे. त्यामध्ये कोणतीही गडबड केली जाणार नाही. कथित व्हिडीओची सत्यता पडताळल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. या चौकशीतून नेमके पुढे काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
वसईतून चार कोटींचे कोकेन जप्त
1एनसीबीच्या पथकाने शुक्र वारी वसई येथे छापा घालून मोठ्या प्रमाणात कोकेनचा साठा जप्त केला. त्याची किंमत चार कोटी असून याप्रकरणी एस. घंगाळेला अटक केली आहे.
2तो प्रॉपर्टी डीलर असून त्याच्याकडून अमली पदार्थाचे सेवन करीत असलेली हाय प्रोफाइल नावे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या सुरुवातीला इथिओपियाच्या अदिस अबाबा येथून दिल्लीत आलेल्या एका पार्सलमधून ६७० ग्रॅम कोकेन जप्त केले होते.
3त्याच्या तपासाचा प्रवास वसईपर्यंत पोहोचला आहे. याबाबत कसून चौकशी करण्यात येत असल्याचे एनसीबीचे उपसंचालक (अभियान ) केपीएस मल्होत्रा यांनी शनिवारी दिल्लीत एका वृत्तसंस्थेला सांगितले.