सांगलीत प्रेमीयुगुलाची आत्महत्या  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 05:35 AM2018-12-26T05:35:36+5:302018-12-26T05:35:50+5:30

बोरगाव (ता. तासगाव) येथील गणेश बाळासाहेब पाटील (वय ३४) व सारिका संभाजी पाटील (२०) या प्रेमीयुगुलाने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली.

Sangli lover's suicide | सांगलीत प्रेमीयुगुलाची आत्महत्या  

सांगलीत प्रेमीयुगुलाची आत्महत्या  

Next

तासगाव (जि. सांगली) : बोरगाव (ता. तासगाव) येथील गणेश बाळासाहेब पाटील (वय ३४) व सारिका संभाजी पाटील (२०) या प्रेमीयुगुलाने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. सोमवारी रात्री शेतामध्ये दोघांचेही मृतदेह आढळून आले.
गणेश व सारिका हे शेजारीच राहत होते. तीन महिन्यापूर्वी ते घरातून पळून गेले होते. तब्बल दीड महिना ते घराकडे फिरकले नव्हते. त्यानंतर ते घरी आले असता त्यांच्याकडे कुटुंबियांनी विचारणा केली. यावेळी त्या दोघांनी आमचे एकमेकांवर प्रेम आहे, आम्ही लग्न करणार आहोत’, असे सांगितले. पण दोघांच्या कुटुंबियांनी त्यास विरोध केला. तेव्हापासून ते नाराज होते.
मध्यंतरीच्या काळात गणेश कोल्हापूर येथे नोकरीला लागला होता, तर सारिका घरीच होती. मात्र दोघे एकमेकांच्या संपर्कात होते.सोमवारी रात्री या दोघांनी विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली.

Web Title: Sangli lover's suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.