साेन्याची बिस्किटे घेऊन फिरत हाेता सांगलीकर; ओडिशामध्ये सव्वा काेटी रकमेसह पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 07:59 AM2022-08-12T07:59:00+5:302022-08-12T07:59:05+5:30

जप्त मुद्देमाल आयकर खात्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Sanglikar was walking around with gold biscuits; Caught with half a crore in Odisha | साेन्याची बिस्किटे घेऊन फिरत हाेता सांगलीकर; ओडिशामध्ये सव्वा काेटी रकमेसह पकडले

साेन्याची बिस्किटे घेऊन फिरत हाेता सांगलीकर; ओडिशामध्ये सव्वा काेटी रकमेसह पकडले

googlenewsNext

गंजाम : ओडिशाचा उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांनी गांजा तस्करी विरोधातील शोधमोहिमेदरम्यान गंजाम जिल्ह्यातून १.२२ कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम व २४ सोन्याची बिस्किटे जप्त केली. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या दशरथ शौकर या व्यक्तीकडे बेहिशेबी रक्कम व आनंद सुबुधी या सराफाकडून २.२० किलो वजनाची सोन्याची बिस्किटे आढळून आली.

ब्रह्मपूरचे पोलीस अधीक्षक विवेक एम. यांनी सांगितले की, इतकी मोठी रक्कम तसेच सोन्याची बिस्किटे कुठून आणली याची माहिती शौकर व आनंद सुबुधी हे दोघेही देऊ शकले नाहीत. जप्त मुद्देमाल आयकर खात्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. या दोघांकडील पैसा व सोने यांचा स्रोत शोधणे सुरू आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Sanglikar was walking around with gold biscuits; Caught with half a crore in Odisha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.