किन्नरासोबत कॉंग्रेसच्या माजी नेत्याने केलं लग्न, मग लावला 50 लाखांचा चुना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 12:50 PM2022-10-05T12:50:54+5:302022-10-05T12:51:06+5:30
पोलिसांनी सिमरनच्या तक्रारीवरून आरोपी बलविंदर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला एक दिवसाच्या रिमांडवर ठेवून चौकशी सुरू केली आहे.
पंजाबच्या पटियालाची किन्नर महंत सिमरनने संगरूरच्या जिल्हा यूथ कॉंग्रेसचे माजी प्रधान बलविंदर कुमार उर्फ़ मिट्टू लड्ढावर लग्न करून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. किन्नर महंतने सांगितलं की, बलविंदरने तिच्यासोबत लग्न 50 लाख रूपयांची फसवणूक केली.
पोलिसांनी सिमरनच्या तक्रारीवरून आरोपी बलविंदर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला एक दिवसाच्या रिमांडवर ठेवून चौकशी सुरू केली आहे. पटियालाच्या सिमरनने आरोप लावले की, संगरूरच्या बलविंदर कुमारने तिच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर 50 लाख रूपयांची फसवणूक केली.
पीडिता सिमरनने सांगितलं की, आरोपी बलविंदरने तिला महंतांच्या एका इव्हेंटमध्ये पाहिलं होतं. त्यानंतर प्रेमात पडल्याचं सांगून त्याने तिच्यासोबत लग्न केलं.
सिमरन म्हणाली की, लग्नाआधी बलवंतला हे माहीत होतं की, तो एका किन्नरसोबत लग्न करत आहे. बलवंत तिच्यासोबत अनेक हिल्स स्टेशनवर फिरायलाही गेला होता. चंडीगढमध्ये पती-पत्नी म्हणून बरेच दिवस सोबत राहिले. यादरम्यान बलवंतने तिला 50 लाख रूपयांचा चुना लावला.
मीडियासमोर सिमरनने आरोपीसोबतचे तिचे अनेक फोटोही दाखवले. त्यानंतर सिमरनने पोलीस, ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन आणि वुमेन सेलमध्ये अनेक फेऱ्या मारल्या. आता बलवंत विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितलं की, कथितपणे आरोपी बलविंदर कुमार उर्फ़ मिट्टू लड्ढा विरोधात केस दाखल केली आहे. त्याला कोर्टात हजर करून एक दिवसाच्या रिमांडवर ठेवण्यात आलं आहे. त्याची चौकशी केली जाईल. आरोप आहे की, बलविंदरने किन्नर सिमरन महंतकडून कॅश आणि दागिने पळवले.