Sanjay Raut: संजय राऊतांचा यंदाचा गणेशोत्सव तुरुंगातच! ५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 11:28 AM2022-08-22T11:28:26+5:302022-08-22T11:29:43+5:30

गोरेगांव पत्राचाळ प्रकरणी राऊतांना ED कडून झाली अटक

Sanjay Raut in jail stay extended till september 5 in Goregaon patra chawl scam Ganapati Utsav in prison | Sanjay Raut: संजय राऊतांचा यंदाचा गणेशोत्सव तुरुंगातच! ५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीचे आदेश

Sanjay Raut: संजय राऊतांचा यंदाचा गणेशोत्सव तुरुंगातच! ५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीचे आदेश

Next

Sanjay Raut Custody Extended: मुंबईच्या गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदारसंजय राऊत यांना आज पुन्हा एकदा ED च्या विशेष PMLA न्यायालयाने धक्का दिला. गोरेगावच्या पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणी झालेल्या गैरव्यवहारात शिवसेनेचे खासदार संजय यांना ईडीकडून १ ऑगस्टला रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. त्यांच्या भांडुपच्या निवासस्थानी तब्बल साडे नऊ आणि त्यानंतर ईडी कार्यालयात आठ तास कसून चौकशी केल्यानंतर त्यांना अटक झाली होती. सुरूवातीला संजय राऊतांना ४-४ दिवसांची ईडी कोठडी देण्यात आली होती. तर ८ ऑगस्टला त्यांना आजच्या दिवसापर्यंत न्यायालयीन कोठडी सनावण्यात आली होती. आज कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यांना पुन्हा ५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीतच ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे त्यांचा यंदाचा गणेशोत्सव तुरूंगातच जाणार असल्याचे चित्र आहे.

पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत चांगलेच अडचणीत आले होते. रविवारी सकाळी ७ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी अचानक त्यांच्या भांडूप येथील घरी छापेमारी केली. त्यात ईडीच्या अधिकाऱ्यांना ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. याचसोबत काही कागदपत्रे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली. ते चौकशीत सहकार्य करत नसल्याचे सांगत सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान राऊत यांना ईडीने बॅलॉर्ड इस्टेट येथील कार्यालयात  चौकशीसाठी आणले. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. यानंतर त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. आपल्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. सर्व कागदपत्रे चार्टर्ड अकाउंटंटकडे आहेत तसेच ती कागदपत्रे मी प्राप्तिकर विभागालाही दिल्याची माहिती राऊत यांनी ईडीला  दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, अधिकाऱ्यांना झडतीत दुसरी काही कागदपत्रे सापडली आहेत. १९ जुलै आणि २७ जुलै असे दोनदा ते ईडीच्या चौकशीला अनुपस्थित राहिले होते. १,०३९  कोटी रुपयांच्या पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्यामध्ये राऊत यांचे निकटवर्तीय आणि गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे माजी संचालक प्रवीण राऊत यांना वैयक्तिक १०० कोटी रुपयांचा लाभ झाल्याची माहिती प्रवीण यांच्या चौकशीत पुढे आल्याचे बोलले जात होते. त्यानुसार ही कारवाई होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई सुरू करून त्यांना विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी सुरुवातीला संजय राऊत यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. याच वेळी संजय राऊत यांना न्यायालयात हजर करण्यासाठी प्रॉडक्शन वॉरंट काढावे, अशी विनंती  नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यातर्फे शिवडी महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात करण्यात आली होती. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी संजय राऊत यांनी आपल्यावर आरोप निराधार असल्याचे सांगितले. या प्रकरणातील सुनावणीला राऊत यांना 'व्हीसी'द्वारे हजर करण्यात आले होते. यावेळी तुम्हाला आरोप मान्य आहेत का, अशी विचारणा न्यायाधीशांनी केली असता, 'मला माझ्या वकिलांशी चर्चा करण्याची संधी मिळाली नाही', असे सांगत आरोप अमान्य असल्याचे संजय राऊत म्हणाले. तसेच मी दोषी नाही. माझ्यावरील आरोप निराधार व खोटे असल्याचा दावा संजय राऊत त्यांनी केला.

Web Title: Sanjay Raut in jail stay extended till september 5 in Goregaon patra chawl scam Ganapati Utsav in prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.