Sanjay Raut :संजय राऊतांच्या अडचणीत वाढ?; पोलिसांनी स्वप्ना पाटकरांकडून ओरिजिनल ऑडिओ मागवला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 05:19 PM2022-08-02T17:19:47+5:302022-08-02T21:15:58+5:30

Sanjay Raut : संजय राऊत यांनी पाटकर यांना ईडीसमोर साक्ष न देण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे

Sanjay Raut: Increase in Sanjay Raut's problem; The police sought the original audio from Swapna Patkar | Sanjay Raut :संजय राऊतांच्या अडचणीत वाढ?; पोलिसांनी स्वप्ना पाटकरांकडून ओरिजिनल ऑडिओ मागवला

Sanjay Raut :संजय राऊतांच्या अडचणीत वाढ?; पोलिसांनी स्वप्ना पाटकरांकडून ओरिजिनल ऑडिओ मागवला

googlenewsNext

मुंबई : ईडीने अटक केलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मुंबईपोलिसांनी नोंदवलेल्या धमकीच्या प्रकरणात तक्रारदाराकडून मूळ (ओरिजिनल) ऑडिओ क्लिप मागवण्यात आली आहे. स्वप्ना पाटकर यांनी राऊत यांच्याविरोधात ईडीमध्ये तक्रार दाखल केली आहे. यानंतर स्वप्ना यांना फोनवरून जीवे मारण्याची आणि दुष्कर्म करण्याची धमकी देण्यात आली.

संजय राऊत यांनी पाटकर यांना ईडीसमोर साक्ष न देण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. संजय राऊत आणि स्वप्ना पाटकर यांचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर पाटकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी रविवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना पाटकर यांच्यासोबत बोलणाऱ्या कॉलरची ओळख पटवायची आहे, त्यामुळे मूळ ऑडिओची कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये चाचणी व्हावी अशी त्यांची इच्छा आहे.

2016 च्या ऑडिओमध्ये धमकी देत आहे एक माणूस
नुकतीच एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये एक पुरुष एका महिलेला अपमानास्पद भाषेत धमकावताना ऐकू येत आहे. मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारदाराने पेन ड्राईव्हमधील ऑडिओ क्लिप पोलिसांना दिली होती, पण आम्हाला मूळ ऑडिओ हवा आहे. हा ऑडिओ 2016 मध्ये रेकॉर्ड करण्यात आला होता. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारदाराने पेन ड्राईव्हमधील ऑडिओ क्लिप पोलिसांना दिली होती, मात्र आम्हाला मूळ ऑडिओ हवा आहे. हा ऑडिओ 2016 मध्ये रेकॉर्ड करण्यात आला होता. मूळ रेकॉर्डिंग सापडल्यानंतर, कॉलरची ओळख स्थापित करण्यासाठी आम्ही फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेची मदत घेऊ.

पाटकर यांना सुरक्षा पुरवली
पोलिसांनी राऊत यांच्याविरुद्धच्या एफआयआरमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम ५०४ , ५०६ आणि ५०९ या कलमांचा वापर केला आहे. स्वप्ना पाटकर यांनी रविवारी पोलिसांत जबाब नोंदवला. पाटकर यांच्या विनंतीवरून त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. टाईप केलेल्या पत्रात आपल्याला बलात्कार आणि खुनाची धमकी देण्यात आल्याचे पाटकर यांनी पोलिसांना सांगितले होते. हे पत्र 15 जुलै रोजी त्यांच्या घरी आलेल्या वर्तमानपत्रात टाकण्यात आले होते.

Web Title: Sanjay Raut: Increase in Sanjay Raut's problem; The police sought the original audio from Swapna Patkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.