संजय राऊत खोटारडे! सुशांतच्या वडिलांनी दोन लग्ने केली नाहीत; मामाचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 07:48 AM2020-08-10T07:48:10+5:302020-08-10T07:50:28+5:30
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाचे मुखपत्र सामनामध्ये अनेक आरोप केले आहेत. बिहार पोलीस आणि केंद्राने महाराष्ट्र सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
पटना : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या (Sushant singh rajput news) प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून मंत्री आदित्य ठाकरेंचे नाव येऊ लागल्याने शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊतही या मैदानात उतरले आहेत. राऊत यांनी सुशांतच्या वडिलांवर गंभीर आरोप केले होते. यावर सुशांतच्या मामाने राऊत खोटे बोलत आहेत, असा आरोप केला आहे.
सुशांतचे त्याच्या कुटुंबाशी संबंध चांगले नव्हते असा दावा राऊत यांनी सामनामधून केला होता. सुशांतच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते, जे सुशांतला आवडलेले नव्हते, असा आरोप राऊत यांनी केला होता. यावर एनबीटीने सत्यता पडताळून पाहिली असता राऊत यांचा दावा खोटा असल्याचे आढळले. सुशांतचे मामा आर सी सिंग यांनी सांगितले की, सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केली नाहीत. संजय राऊत चुकीचे बोलत आहेत.
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावरून चुकीचे विधान केले आहे. राऊत असे वक्तव्य करून प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न करत आहेत. असे काहीतरी बोलून एखाद्याची प्रतिमा मलिन करणे ही चांगली बाब आहे का? बिहारमध्ये जे राहतात त्या सगळ्यांना माहिती आहे, की सुशांतच्या वडिलांनी एकच लग्न केले आहे, असे सिंग म्हणाले.
राऊत काय म्हणालेले?
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाचे मुखपत्र सामनामध्ये अनेक आरोप केले आहेत. बिहार पोलीस आणि केंद्राने महाराष्ट्र सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे हे भाजपाचे नेते आहेत आणि 2009मध्ये त्यांच्यावर आरोप लावण्यात आले होते, असा आरोपही त्यांनी केला आहे.सुशांत सिंग राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक ‘एफआयआर’ दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही. बिहारचे पोलीस म्हणजे ‘इंटरपोल’ नव्हे. एका गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. त्याच वेळी दुसऱ्या राज्याचा काहीच संबंध नसताना त्यांनी समांतर तपास सुरू करावा हा मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास आहे' असं म्हणत संजय राऊत यांनी बिहार पोलिसांवर निशाणा साधला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
बापरे! कोरोना पाठ सोडेना; निगेटिव्ह रुग्ण महिनाभरात दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह
बाबो! आरोग्य पथक दिसताच कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाने ठोकली धूम; एक तासानंतर लागला हाती
Video: 'कामं होत नसतील तर दंगा घाला'; यशोमती ठाकूरांचे महसूलमंत्र्यांसमोर वादग्रस्त वक्तव्य
चार महिन्यांत तीन तरुणींनी उडविला 9 लग्नांचा बार; पोलीस ठाण्यात उडाला 'हाहाकार'
रिया एकटी नाहीय, सुशांतचे पैसे उडविण्यात सीएही सहभागी; ED समोर केला मोठा गौप्यस्फोट
Government Jobs: AIIMS मध्ये नोकरीची बंपर संधी; नर्सना मिळणार सातवा वेतन आयोग
BOI Recruitment 2020: बँक ऑफ इंडियात नोकरीची सुवर्णसंधी; परिक्षा नाही केवळ मुलाखत