वसई-विरारमध्ये दुचाकी व मोबाईल चोरणाऱ्या सराईत त्रिकुटास अटक; ८ गुन्हे उघडकीस 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 07:20 PM2022-07-30T19:20:03+5:302022-07-30T19:20:36+5:30

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दुचाकी व जबरी मोबाईल चोरी करणाऱ्या तिघा सराईतांच्या मुसक्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने आवळल्या असून त्यांनी ८ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.  

Sarait trio arrested for stealing two-wheelers and mobile phones in Vasai-Virar; 8 Crime detection | वसई-विरारमध्ये दुचाकी व मोबाईल चोरणाऱ्या सराईत त्रिकुटास अटक; ८ गुन्हे उघडकीस 

वसई-विरारमध्ये दुचाकी व मोबाईल चोरणाऱ्या सराईत त्रिकुटास अटक; ८ गुन्हे उघडकीस 

Next

मीरारोड - 

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दुचाकी व जबरी मोबाईल चोरी करणाऱ्या तिघा सराईतांच्या मुसक्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने आवळल्या असून त्यांनी ८ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.  

दुचाकी चोरी, जबरी चोऱ्या च्या गुन्ह्यांचा समांतर तपास उपायुक्त मुख्यालय विजयकांत सागर व सहायक आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली  निरीक्षक राहुल राख, सहायक निरीक्षक दत्तात्रय सरक व नितीन बेन्द्रे सह  चंद्रकांत पोशिरकर, गोविंद केंद्रे, राजाराम काळे, शिवाजी पाटील, महेश वेल्हे, सुशील पवार, संग्राम गायकवाड, सतीश जगताप यांचे पथक करत होते. 

पोलिसांनी तांत्रीक विश्लेषण व मिळालेल्या बातमीचे आधारे मोटार सायकल चोरी करणा-या राजेशकुमार शामकुमार जैस्वाल (२१) रा. वय २१ वर्षे रा. नालासोपारा याच्यावर वसई पूर्व, गौराईपाडा या परिसरात सतत दोन दिवस पाळत ठेवून सापळा रचुन अटक केली . त्याच्या कडून ३ दुचाकी , २ मोबाईल व एक रिक्षा असा १ लाख २७ हजारांचा मुद्देमाल सापडला. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत त्याने केलेले वाहन चोरीचे ४ आणि मोबाईल चोरीचे २ गुन्हे उघडकीस आले. 

तर विरार पूर्वेच्या मनवेल पाडा भागातून अभिषेक अरविंदकुमार यादव (२७) व सचिन राकेश सिंग (२६ ) दोघे रा. नालासोपारा पूर्व यांना ताब्यात घेवुन त्यांच्या कडून जबरी चोरीच्या गुन्ह्यातील २ मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा ६० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला . ह्या दोघांनी २ गुन्हे केल्याचे समोर आले आहे.  

पेल्हार व नालासोपारा हद्दीतील प्रत्येकी २ तर नवघर, आचोळे, तुळींज, वालीव पोलीस ठाण्यातला प्रत्येकी १ असे ८ गुन्हे मध्यवर्ती गुन्हे शाखेने उघडकीस आणले आहेत. 

Web Title: Sarait trio arrested for stealing two-wheelers and mobile phones in Vasai-Virar; 8 Crime detection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.