धक्कादायक; शिष्याच्या वेशात आले, पाया पडले अन् ज्योतिषाचार्यांवर चाकूने सपासप वार केले!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 04:41 PM2022-07-05T16:41:08+5:302022-07-05T17:59:03+5:30

हुबळीच्या एका हॉटेलमध्ये वास्तू तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या करण्यात आली. ही संपूर्ण घटना हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

'Saral Vastu' fame Chandrasekhar Guruji brutally murdered in a hotel of Hubli, stabbed several times | धक्कादायक; शिष्याच्या वेशात आले, पाया पडले अन् ज्योतिषाचार्यांवर चाकूने सपासप वार केले!

धक्कादायक; शिष्याच्या वेशात आले, पाया पडले अन् ज्योतिषाचार्यांवर चाकूने सपासप वार केले!

googlenewsNext

हुबळी- 'सरल वास्तू'फेम चंद्रशेखर अंगाडी उर्फ चंद्रशेखर गुरुजी यांची मंगळवारी कर्नाटकातील हुबळी येथील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे, ज्यामध्ये हॉटेलच्या रिसेप्शनवर दोन जण त्यांच्यावर सपासप वार करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागलकोट येथील रहिवासी असलेल्या चंद्रशेखर यांनी कंत्राटदार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. नंतर त्यांना मुंबईत नोकरी मिळाली आणि तिथेच ते स्थायिक झाले. पुढे त्यांनी इथेच स्थापत्य व्यवसाय सुरू केला. 3 दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबातील एका मुलाचा हुबळी येथे मृत्यू झाला होता, त्यामुळे ते हुबळीला गेले होते. या घटनेची माहिती मिळताच हुबळीचे पोलीस आयुक्त लाभू राम घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले आहेत. 

व्हिडिओमध्ये काय आहे?
दोन आरोपी हॉटेलच्या वेटिंग एरियात चंद्रशेखर गुरुजींची वाट पाहत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. चंद्रशेखर आल्यानंतर एक आरोपी जवळ जातो आणि त्यांच्या पायाला स्पर्श करतो. त्याचवेळी दुसरा आरोपी चाकू काढून त्यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात करतो. यादरम्यान, दुसरा आरोपीही त्याच्या खिशातून चाकू काढतो आणि दोघे मिळून त्यांच्यावर चाकूने वार करतात. यावेळी हॉटेलमधील काही लोक त्यांना वाचवण्यासाठी पुढे येण्याचा प्रयत्न करतात, मात्र आरोपी त्यांना धक्काबुक्की करतात. 

Web Title: 'Saral Vastu' fame Chandrasekhar Guruji brutally murdered in a hotel of Hubli, stabbed several times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.