"...तेव्हा सगळ्यांचीच तोंडं बंद होतील", गृहमंत्री फडणवीसांचा ललित पाटील प्रकरणावरून इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 04:06 PM2023-10-18T16:06:00+5:302023-10-18T16:06:41+5:30

"मी पळून गेलो नव्हतो, मला पळवलं गेलं", असा ललित पाटीलचा दावा

Sasoon Drugs Case Devendra Fadnavis warning on Lalit Patil arrest regarding Nashik raids | "...तेव्हा सगळ्यांचीच तोंडं बंद होतील", गृहमंत्री फडणवीसांचा ललित पाटील प्रकरणावरून इशारा

"...तेव्हा सगळ्यांचीच तोंडं बंद होतील", गृहमंत्री फडणवीसांचा ललित पाटील प्रकरणावरून इशारा

Devendra Fadnavis on Lalit Patil Arrested : गेल्या काही दिवसांपासून गाजणारं ससून ड्रग्स प्रकरण (Sasoon Drugs Case) नवनवी वळणं घेत आहेत. आज या प्रकरणातील एक आरोपी आणि नाशिकमधील धाड टाकण्यात आलेल्या ड्रग्स कारखान्याशी संबंधित ललित पाटीललाअटक करण्यात आली. ललित पाटील हा काही काळ फरार असल्याचे बोलले जात होते. पण आज ललित मुंबईत आला त्यावेळी त्याने असे सांगितले की त्याला पळवून लावण्यात आलं होतं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. विरोधकांनी या प्रकरणात सरकारला टार्गेट केले. त्यासोबतच काही मंत्र्यांकडेही नाव न घेता बोट दाखवले. याच दरम्यान, या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान करत काहींना इशारा दिला.

"ड्रग्स फ्री महाराष्ट्र या संकल्पनेतून राज्यभरातील सरकारी यंत्रणा काम करत आहेत. याचदरम्यान मुंबई पोलिसांना नाशिकमधील या कारखान्याची माहिती मिळाली होती. त्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली. वेगवेगळ्या ठिकाणीही धाडी टाकण्यात आल्या. आता ललित पाटीलला अटक झाली आहे. त्यातून एक मोठं नेक्सस बाहेर येईल. मला काही गोष्टी कळल्या आहेत पण त्याबद्दल नीट माहिती घेऊन योग्य वेळी मी बोलेन. पण एवढंच सांगतो की एक मोठी नेक्सस यातून आम्ही बाहेर काढणार आहोत. यातून जे बाहेर येईल तेव्हा अनेक बोलणाऱ्यांची तोंड बंद होतील", अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ललित पाटील प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.

"ललित पाटील काय बोलतो याकडे लक्ष देण्यापेक्षा आता पोलिस तपासातून जे नेक्सस बाहेर येईल, त्यावर लक्ष द्यायला लागेल. ते नेक्सस बाहेर आलं की सगळ्यांची तोंड गप्प होतील. ससून मध्ये जे प्रकार घडले आहेत, त्याबद्दलही पोलीस सर्व प्रकारचा तपास करत आहेत. या सर्व गोष्टींचा, घटनांचा तपास केला जाईल. दोषींना अजिबात सोडणार नाही. सगळ्यांवर कारवाई केली जाईल," असेही फडणवीस म्हणाले.

Web Title: Sasoon Drugs Case Devendra Fadnavis warning on Lalit Patil arrest regarding Nashik raids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.