Satara Crime | व्यावसायिकाची मध्यरात्री सहा गोळ्या झाडून हत्या, साताऱ्यात घडली धक्कादायक घटना

By दत्ता यादव | Published: January 24, 2023 10:01 AM2023-01-24T10:01:21+5:302023-01-24T10:01:54+5:30

हल्ल्याचे कारण अस्पष्ट, महामार्गालगत वाढे गावच्या हद्दीतील घटना

Satara Crime A businessman was killed by six bullets in the middle of the night, a shocking incident took place in Satara | Satara Crime | व्यावसायिकाची मध्यरात्री सहा गोळ्या झाडून हत्या, साताऱ्यात घडली धक्कादायक घटना

Satara Crime | व्यावसायिकाची मध्यरात्री सहा गोळ्या झाडून हत्या, साताऱ्यात घडली धक्कादायक घटना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा शहराजवळ असलेल्या महामार्गावरील वाढे गावच्या गावच्या हद्दीत गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अमित आप्पासाहेब भोसले (वय ३८, रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांच्यावर एका पाठोपाठ सहा गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे सातारा शहरात प्रचंड खळबळ उडाली असून, ही घटना मध्यरात्री एकच्या सुमारास घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वाढे फाट्यावरील एका हॉटेल समोर तीन ते चार तरुण गप्पा मारत उभे राहिले होते. त्यावेळी तेथे अमित भोसले हे सुद्धा होते.  त्यातील एका युवकाने अमित भोसले यांच्यावर अचानक गोळीबार केला. एकूण सहा गोळ्या त्यांच्यावर झाडण्यात आल्या. या गोळीबारात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या गोळीबाराच्या आवाजाने आजूबाजूचे व्यावसायिक ही तेथे धावत आले. मात्र, तोपर्यंत गोळीबार करणारे तरुण तेथून पसार झाले होते. या प्रकाराची माहिती सातारा तालुका पोलिस, सातारा शहर आणि एलसीबी पोलिसांना मिळाल्यानंतर मोठ्या संख्येने पोलिसांचा फौज फाटा वाढे फाट्याकडे रवाना झाला. पोलिसांनी वाढे फाटा परिसर पिंजून काढला. मात्र, संशयित आरोपी सापडले नाहीत. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला हे मात्र अध्यापही पुढे आले नाही.  व्यावसायिक अमित भोसले यांचा मृतदेह  जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्या असून रुग्णालयासमोर कुटुंबीयांनी, मित्रांनी धाव घेतली आहे.

आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पाच पथके तयार केली असून, ही पथके सातारा शहरासह पुणे, कराड, कोल्हापूर येथे रवानाही झाली आहेत. व्यावसायिक कारणातून किंवा आर्थिक देवाणघेवाणातून हा खून झाला आहे का, याची पोलिस माहिती घेत आहेत.

 दरम्यान, सोमवारी रात्री आठ वाजता सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पोवई नाक्यावर पुण्याप्रमाणेच कोयता गँगने दहशत माजवली होती. ही दहशत पोलिसांनी काही मिनिटांतच मोडीत काढली. मात्र, मध्यरात्री पुन्हा गोळीबाराची घटना घडून व्यावसायिकाची हत्या झाल्याने साताऱ्यात गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Satara Crime A businessman was killed by six bullets in the middle of the night, a shocking incident took place in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.