Satara Crime News: साताऱ्यात खळबळ! भाजपाच्या माजी आमदाराच्या बंद बंगल्यात सापडला अर्धवट पुरलेला मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 12:13 PM2022-12-31T12:13:22+5:302022-12-31T12:13:54+5:30

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे. यामुळे तो महिलेचा की पुरुषाचा ते अद्याप समजू शकलेले नाहीय. पोलीस आजुबाजुच्या लोकांकडे चौकशी करत आहेत. 

Satara Crime News: partially buried body was found in the closed bungalow of former BJP MLC Kanta Nalawade | Satara Crime News: साताऱ्यात खळबळ! भाजपाच्या माजी आमदाराच्या बंद बंगल्यात सापडला अर्धवट पुरलेला मृतदेह 

Satara Crime News: साताऱ्यात खळबळ! भाजपाच्या माजी आमदाराच्या बंद बंगल्यात सापडला अर्धवट पुरलेला मृतदेह 

googlenewsNext

सातारा : सातारा तालुक्यातील वाढे येथे मातीत अर्धवट पुरलेला मृतदेह आढळून आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तालुका पोलीस रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी होते. मृतदेहाबद्दल माहिती घेण्याचे काम सुरू होते. भाजपाच्या माजी आमदार कांताताई नलावडे यांच्या बंद असलेल्या बंगल्याच्या परिसरात हा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाढे येथे माजी आमदार कांताताई नलावडे यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानाच्या परिसरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास अर्धवट पुरलेल्या स्थितीत मृतदेह दिसून आला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यावेळी नागरिकांनीही गर्दी केली होती.

बंगल्याच्या परिसराची साफसफाई करत असताना हा प्रकार समोर आला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे. यामुळे तो महिलेचा की पुरुषाचा ते अद्याप समजू शकलेले नाहीय. पोलीस आजुबाजुच्या लोकांकडे चौकशी करत आहेत. 

सातारा तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत ते वाढे येथे होते. मृतदेह कोणाचा आहे, याबाबत रात्री उशिरापर्यंत माहिती घेण्याचे काम सुरू होते. तर वाढे येथे मृतदेह आढळून आल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. पोलिस अधिक तपास घेत आहेत.

Web Title: Satara Crime News: partially buried body was found in the closed bungalow of former BJP MLC Kanta Nalawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.