Satish Kaushik यांच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण; आता दिल्ली पोलीस उचलणार मोठं पाऊल!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 04:23 PM2023-03-13T16:23:51+5:302023-03-13T16:24:44+5:30
...तत्पूर्वी, आपल्या पतीने सतीश कौशिक यांच्याकडून व्यवसायासाठी 15 कोटी रुपये घेतले होते आणि हे पैसे परत करावे लागू नयेत, यासाठी त्यांनी कट रचून चुकीचे औषध दिले, असा आरोप कुबेर ग्रुपचे मालक विकास मालू यांच्या पत्नीने केला होता.
बॉलिवूड अभिनेते तथा दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या मृत्यू प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. या प्रकरणात आता विकास मालू (Vikas Malu) यांच्या पत्नीचा जबाब नोंदवून चौकशी करण्याची दिल्ली पोलिसांची इच्छा आहे. तत्पूर्वी, आपल्या पतीने सतीश कौशिक यांच्याकडून व्यवसायासाठी 15 कोटी रुपये घेतले होते आणि हे पैसे परत करावे लागू नयेत, यासाठी त्यांनी कट रचून चुकीचे औषध दिले, असा आरोप कुबेर ग्रुपचे मालक विकास मालू यांच्या पत्नीने केला होता.
पोलीस विकास मालू यांच्या पत्नीला दुसऱ्यांदा नोटिस पाठवणार -
दिल्ली पोलीसमधील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात अद्याप काहीही संशयास्पद आढळलेले नाही. तसेच त्यांच्या कुटुंबानेही कसल्याही प्रकारचा संशय व्यक्त केलेला नाही. यानंतर आता, दिल्ली पोलीस यासंदर्भात विकास मालू यांच्या पत्नीला दुसऱ्यांदा नोटीस पाठवणार आहे. पोलीस विकास मालू यांच्या पत्नीचा जबाब नोंदवण्याबरोबरच चोकशीही करू इच्छिते. दिल्ली पोलिसांनी तक्रारीच्या आधारे विविध प्रश्नांची यादीही तयार केली आहे.
दाऊदसोबत विकासच्या संबंधांची चौकशी करत आहे पोलीस -
सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात दिल्ली पोलिसांना अद्याप काहीही संशयास्पद आढळलेले नाही. मात्र असे असतानाही पोलीस प्रत्येक अँगलने तपास करत आहेत. दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, नोंदवलेले जबाब आणि तपासानंतर या मृत्यू प्रकरणात काहीही संशयास्पद आढळलेले नाही. तक्रारीत, विकास मालू यांच्या दाऊदशी असलेल्या संबंधांसंदर्भात बोलताना, प्रत्येक मुद्द्याची सखोल चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
यातच, सतीश कौशिक यांच्या पत्नी शशी कौशिक यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. सतीश कौशिक आणि विकास मालू हे चांगले मित्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याचवेळी त्यांनी विकास मालू यांनी 15 कोटी रुपये घेतल्याचेही फेटाळले. तसेच, विकास मालू 'खूप श्रीमंत' व्यक्ती असून त्यांना पैसे मागण्याची गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.