गोकुळ जन्माष्टमी निमित्त सत्संग आयोजित करणाऱ्या आश्रमावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 04:09 PM2020-08-13T16:09:56+5:302020-08-13T16:11:12+5:30

उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील ईश्वर प्रेम आश्रमात बुधवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान गोकुळ जन्माष्टमी निमित्त सत्संगचे आयोजन केले होते.

Satsang on the occasion of Gokul Janmashtami in Ulhasnagar, case filed against the ashram | गोकुळ जन्माष्टमी निमित्त सत्संग आयोजित करणाऱ्या आश्रमावर गुन्हा दाखल

गोकुळ जन्माष्टमी निमित्त सत्संग आयोजित करणाऱ्या आश्रमावर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देकोरोना महामारीत नागरिकांना सत्संगसाठी एकत्र जमाविल्याप्रकरणी आश्रमाच्या संगीता कारेरा, अशोक धसेजा, अनिता डींगारीया यांच्यासह ९ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

उल्हासनगर : ईश्वर प्रेम आश्रमाने गोकुळ जन्माष्टमीचे औचित्य साधून सत्संगाचे आयोजन केल्या प्रकरणी हिललाईंन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सत्संगला १०० महिला व पुरुष सहभागी झाले असून कोरोना संसर्गाची भीती व्यक्त होत आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील ईश्वर प्रेम आश्रमात बुधवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान गोकुळ जन्माष्टमी निमित्त सत्संगचे आयोजन केले होते. विनापरवाना आयोजित केलेल्या सत्संगाला १०० पेक्षा जास्त महिला व पुरुष सहभागी झाल्याची माहिती हिललाईन पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन विनापरवाना आयोजित केलेल्या सत्संग बाबत आश्रम चालकांना विचारणा केली. कोरोना महामारीत नागरिकांना सत्संगसाठी एकत्र जमाविल्याप्रकरणी आश्रमाच्या संगीता कारेरा, अशोक धसेजा, अनिता डींगारीया यांच्यासह ९ जणांविरोधात  पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी 

 

सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत

Web Title: Satsang on the occasion of Gokul Janmashtami in Ulhasnagar, case filed against the ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.