जीव वाचवण्यासाठी ट्राफिक पोलिसाने घेतली कारच्या बोनेटवर उडी, ४०० मीटर दूरवर घेऊन गेला चालक

By पूनम अपराज | Published: October 14, 2020 08:11 PM2020-10-14T20:11:44+5:302020-10-14T20:14:04+5:30

Crime News : कार चालकाने पोलीस कर्मचाऱ्याला बोनेटवर सुमारे चारशे मीटर अंतर दूर नेले.

To save his life, the traffic police jumped on the bonnet of the car and took the driver 400 meters away | जीव वाचवण्यासाठी ट्राफिक पोलिसाने घेतली कारच्या बोनेटवर उडी, ४०० मीटर दूरवर घेऊन गेला चालक

जीव वाचवण्यासाठी ट्राफिक पोलिसाने घेतली कारच्या बोनेटवर उडी, ४०० मीटर दूरवर घेऊन गेला चालक

Next
ठळक मुद्दे नागमोडी वळणं घेऊन पोलिसाला करवरून खाली पडण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी चालकाला लोकांच्या मदतीने पकडले.

दिल्ली कैंट भागात कार चालविणाऱ्या युवकाने ट्राफिक पोलिस हवालदाराला चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वत: चा बचाव करत असताना पोलीस शिपाई उडी मारुन कारच्या बोनेटवर चढला. असे असूनही आरोपींने गाडीचा वेग वाढवला. कार चालकाने पोलीस कर्मचाऱ्याला बोनेटवर सुमारे चारशे मीटर अंतर दूर नेले.

मग नागमोडी वळणं घेऊन पोलिसाला करवरून खाली पडण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी चालकाला लोकांच्या मदतीने पकडले. विशेष म्हणजे, दिल्लीत गाडीची फॅन्सी नंबर प्लेट पाहिल्यानंतर ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्याने चालकास गाडी थांबविण्याचा इशारा केला. परंतु, थांबण्याऐवजी कारस्वाराने पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न केला.


काय आहे संपूर्ण प्रकरण
महिपाल सिंग दिल्ली कैंट ट्रॅफिक सर्कलमध्ये तैनात आहे. सोमवारी त्यांना धौलाकुआं येथे तैनात करण्यात आले होते. सायंकाळी पाच वाजता टिळक नगरकडे जाणाऱ्या फॅन्सी नंबर प्लेट आय 20 कारला पाहून शिपायाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. उत्तम नगर येथील शुभम या 22 वर्षीय युवक कार चालवत होता.

शुभमसमवेत त्याचा मित्र उत्तम नगर रहिवासी कारमध्ये होता. शुभमने सांगितले की, शिपाई बोनेटवर पडल्यानंतर त्याला भीती वाटली आणि म्हणूनच त्याने कार चालविणे सुरू केले. शुभमने सुमारे 400 मीटर कार चालविली आणि त्यानंतर महिपाल सिंगला बोनेटवर लटकवले आणि तेथून पळ काढू लागला. मग तो पकडला गेला.
 

Web Title: To save his life, the traffic police jumped on the bonnet of the car and took the driver 400 meters away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.