म्हणे, ‘मी मंत्र्याचा पीए’, सरकारी नोकरीचे दाम्पत्याला आमिष, ८० लाखांची फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 12:10 PM2024-03-25T12:10:29+5:302024-03-25T12:13:56+5:30

याप्रकरणी गंगापूर पोलिसांत संशयित आरोपी सुशील भालचंद्र पाटील (रा. पंचवटी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Saying, 'I'm a Minister's PA', Lure couple for government job, 80 lakh fraud | म्हणे, ‘मी मंत्र्याचा पीए’, सरकारी नोकरीचे दाम्पत्याला आमिष, ८० लाखांची फसवणूक 

म्हणे, ‘मी मंत्र्याचा पीए’, सरकारी नोकरीचे दाम्पत्याला आमिष, ८० लाखांची फसवणूक 

नाशिक :  सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींची फसवणुकीचे प्रकार वारंवार घडत असताना एका मंत्र्यांचा पीए असल्याचे सांगून एकाने गंगापूर रोडवरील दाम्पत्याला सरकारी नोकरीला आमिष दाखविले. तसेच त्यांची ८० लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

याप्रकरणी गंगापूर पोलिसांत संशयित आरोपी सुशील भालचंद्र पाटील (रा. पंचवटी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगापूर रोडवरील आनंदवली थांबा परिसरात राहणारे फिर्यादी सुभाष सुरेश चेवले (३९) यांना व त्यांच्या पत्नीला सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून २०२२ सालापासून आतापर्यंत ३५ लाख रुपये उकळण्यात आले.

तसेच, अन्य दोघांचीही अशाचप्रकारे संशयित पाटील याने पैसे उकळून एकूण ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांनी पाटील यास ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्याविरूद्ध यापूर्वीही अशाच प्रकाचे फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल आहेत. 

Web Title: Saying, 'I'm a Minister's PA', Lure couple for government job, 80 lakh fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.