धक्कादायक! CCTV खराब, नाही वाजला अलार्म; SBI चे ATM कापून चोरांनी लंपास केले 20 लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 02:28 PM2023-01-10T14:28:36+5:302023-01-10T14:34:20+5:30
चोरट्यांनी एटीएम बुथमध्ये प्रवेश करून थेट कॅश बॉक्स पळवून नेला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बस्ती जिल्ह्यात चोरांचा वावर वाढला आहे. येथे चोरट्यांनी एटीएम बुथमध्ये प्रवेश करून थेट कॅश बॉक्स पळवून नेला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मशीनमध्ये 20 लाख रुपये रोख असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कप्तानगंज मार्केटमध्ये एसबीआय बँकेचे एटीएम असून त्यातील पैसे लंपास करण्यात आले आहे.
चोरट्यांनी कॅश बॉक्स गॅस कटरच्या सहाय्याने कापून पळवून नेला. चोरट्यांनी एटीएम गॅस कटरने कापले, मात्र पोलिसांना सुगावा लागला नाही. पोलीस रात्रभर झोपून राहिल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी सुमारे 20 लाख रुपये एटीएममध्ये टाकण्यात आले. त्यानंतर किती लोकांनी पैसे काढले आणि एटीएममध्ये किती रोकड होती. हे बँकेच्या तपशीलानंतरच कळेल. एटीएममधील दरोड्याबाबतही बँकेचा निष्काळजीपणा दिसून आला.
एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरा आठवड्याभरापासून खराब आहे. चोरीच्या वेळी अलार्म देखील वाजला नाही. एटीएमजवळील घरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे, मात्र चोरट्यांनी त्याच्या लेन्सवर काळ्या रंगाचा फवारा मारला. पोलिसांना सापडलेल्या सीसीटीव्हीमध्ये दोघांनी चोरीची घटना घडवली आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे कप्तानगंज शहरात चोरट्यांनी रात्रभर गॅस कटरने एटीएम कापले आणि कोणालाही ते समजलं देखील नाही.
सकाळी लोकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस तपासासाठी घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांनी एटीएमचे सर्व डिस्प्ले मॉनिटर सोबत नेले होते. कप्तानगंज शहरातील अंडरपासजवळ एसबीआयचे एटीएम आहे. सकाळी सातच्या सुमारास एटीएमच्या केबिनमधून धूर निघत असल्याचे तेथून जाणाऱ्या काही लोकांच्या लक्षात आले. कुणीतरी पोलिसांना कळवले. कप्तानगंज पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शटर उघडले. तेव्हा आतील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"