SBI चा करोडो ग्राहकांना निर्वाणीचा इशारा; Video पहाल तर वाचाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 03:08 PM2020-07-19T15:08:40+5:302020-07-19T15:12:08+5:30

SBI एसबीआयने ग्राहकांना सावध राहण्यास सांगितले असून ऑनलाईन बँकिंग कसे सुरक्षित करावे याबाबतही मार्गदर्शन केले आहे. 

SBI warns millions of customers; If you watch the video, you will secure from cyber crime | SBI चा करोडो ग्राहकांना निर्वाणीचा इशारा; Video पहाल तर वाचाल

SBI चा करोडो ग्राहकांना निर्वाणीचा इशारा; Video पहाल तर वाचाल

Next

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन घोटाळेबाज बँक ग्राहकांना जाळ्यात ओढत आहेत. बँक खात्याची माहिती चोरण्यासाठी नवनवीन फंडे आजमावत असून हजारात एकतरी त्यांच्या जाळ्यात सापडत आहे. एसएमएस करणे, कॉल करणे आदीसह लिंक पाठविणे असे हातखंडे आहेत. यावर एसबीआयने ग्राहकांना सावध राहण्यास सांगितले असून ऑनलाईन बँकिंग कसे सुरक्षित करावे याबाबतही मार्गदर्शन केले आहे. 


एसबीआयने ट्विटर खात्यावर 45 सेकंदांचा व्हिडीओ पोस्ट करून याबाबत सांगितले आहे. या आधीही एसबीआय ग्राहकांना सावधगिरीचे सल्ले देत आला आहे. 


एसबीआयद्वारा शेअर केलेल्या या व्हि़डीओमध्ये तीन वेगवेगळ्या वेळा दाखविण्यात आल्या आहेत. 

  •  जर तुम्हाला कोणताही फ्रॉड कॉल, ईमेल किंवा मेसेज आला तर त्यामध्ये तुमची खासगी माहिती किंवा अर्जंट पेमेंट करण्यास सांगितले जाते. 
  •  तुमच्या बँक खात्यातून असे ट्रान्झेक्शन होते, जे तुम्ही केलेलेच नसते. 
  •  जर तुम्ही कोणासोबत तुमची खासगी माहिती किंवा खात्याशी संबंधित माहिती शेअर केली असेल.


एसबीआयने नेट बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांना सल्ला दिला आहे की बँकिंग सायबर फ्रॉडची तक्रार एकतर राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार वेबसाईट (https://cybercrime.gov.in/) किंवा पोलीसांकडे जाऊन द्यावी. याशिवाय देशातील सर्वात मोठ्या बँकेचे म्हणने आहे की, सायबर क्राईमच्या छोटाशा घटनेकडेही दुर्लक्ष करू नका. कारण याचा पुढे मोठा फटका बसू शकतो. 



एसबीआयने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, सायबर क्रिमिनल्सपासून आपली सुरक्षा करा. अधिक माहितीसाठी https://bit.ly/3h0jWie  या लिंकवर क्लिक करा. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

दुधाची पिशवी कोरोना फ्री आहे का? कसे सॅनिटाईज कराल...FSSAI ने दिले उत्तर

अन्य महत्वाच्या बातम्या....

चॅलेंज! कोरोनावर जगात कोणीही लस शोधुदे; भारताशिवाय उत्पादन अशक्यच

आयकराच्या फॉर्म 26AS मध्ये मोठे बदल; करदात्यांनो जाणून घ्या फायद्याचे की तोट्याचे

Video: "सुशांतचा आत्मा स्वर्गात, त्याच्यासोबत महिलाही"; जगप्रसिद्ध पॅरानॉर्मल एक्स्पर्टचा दावा

ब्रिटन गेमचेंजर ठरणार! मृत्यूच्या दाढेतील कोरोनाबाधितांना वाचविले; स्टेरॉईडची चाचणी यशस्वी

राजस्थान सत्तासंघर्षावर पहिल्यांदाच वसुंधराराजेंची प्रतिक्रिया; गेहलोतांना थेट मदतीचा झालेला आरोप

चीन चवताळला! दक्षिण समुद्रात घुसलेल्या अमेरिकेला दिले चोख प्रत्यूत्तर

लॉकडाऊनमध्ये भविष्याची चिंता; लोकांची या सरकारी योजनेकडे 'उडी', तुम्हीही विचार करा...

Web Title: SBI warns millions of customers; If you watch the video, you will secure from cyber crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.