विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 09:01 AM2024-05-21T09:01:50+5:302024-05-21T09:02:28+5:30
मंत्रालयाने पत्रकात म्हटले आहे की, जे नोकरीसाठी कंबोडिया तसेच दक्षिण पूर्व आशियात जात आहेत त्यांनी नकली एजंटांपासून सावध राहावे. नोकरीसाठी मंत्रालयाच्या वतीने प्राधिकृत एजंटलाच संपर्क करावा. मंत्रालयाकडून जारी केलेल्या अधिकृत इमेल आयडीवर संपर्क साधावा.
नवी दिल्ली : विदेशात मोठ्या पगाराची नोकरी देण्याची आमिष दाखवून आर्थिक लुबाडणूक करण्याचे प्रकार जोरात सुरु आहेत. लोकांनी अशा फेक नोकरभरतीच्या रॅकेटपासून सावध राहावे. असे फोन आल्यास तत्काळ मंत्रालयात संपर्क साधण्याचे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.
मंत्रालयाने पत्रकात म्हटले आहे की, जे नोकरीसाठी कंबोडिया तसेच दक्षिण पूर्व आशियात जात आहेत त्यांनी नकली एजंटांपासून सावध राहावे. नोकरीसाठी मंत्रालयाच्या वतीने प्राधिकृत एजंटलाच संपर्क करावा. मंत्रालयाकडून जारी केलेल्या अधिकृत इमेल आयडीवर संपर्क साधावा.
अशी होते फसवणूक?
दुबई, बँकॉक, सिंगापूर येथे असलेले बोगस एजंट 'कस्टमर सपोर्ट सर्व्हिस'मधील विविध पदांसाठी जोरदार जाहिराती करतात.
लोकांना मुलाखतीसाठी जाण्याचे तसेच येण्याचे तिकीट आदींचे आमिष दाखवले जाते.
सीमा पार करून बेकायदेशीरपणे अन्य देशात पाठवले जाते. तिथे पकडले गेल्यानंतर युवकांना बंधक बनविले जाते. कामाच्या नावे शारीरिक व मानसिक छळ केला जातो.