चोरीचा माल घेणारा भंगार व्यावसायिक जेरबंद!
By सागर दुबे | Published: May 10, 2023 04:50 PM2023-05-10T16:50:34+5:302023-05-10T16:50:49+5:30
अल्लाउद्दीन सलीम पटेल (रा. सुप्रिम कॉलनी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
जळगाव : एच.डी.फायर कंपनीमध्ये डल्ला मारणा-या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर आता एमआयडीसी पोलिसांनी चोरट्यांकडून चोरीचा माल घेणा-या भंगार व्यावसायिकाला बेड्या ठोकल्या आहेत. अल्लाउद्दीन सलीम पटेल (रा. सुप्रिम कॉलनी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
एच.डी.फायर कंपनीमधून १ लाख ४५ हजार रूपयांचा माल चोरून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी रात्री देवानंद कोळी, विक्की कोळी आणि ईश्वर महाजन यांना कुसूंबा व सुप्रिम कॉलनीमधून अटक केली होती. त्यांना पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी चोरीचा माल हा सुप्रिम कॉलनी येथील महाराष्ट्र स्क्रॅपचा दुकानदार अल्लाउद्दीन पटेल याला विक्री केल्याची माहिती दिली.
त्यानंतर बुधवारी पटेल याला पोलिसांनी अटक केली. त्याला देखील न्यायालयात हजर केले असता १२ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. रंजना पाटील यांनी कामकाज पाहिले. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, साईनाथ मुंढे हे करीत आहेत.