Crime News:  भयानक! डोकं आत, धड बाहेर; दरवाजात अडकून चोराचा तडफडून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 12:36 PM2022-11-28T12:36:06+5:302022-11-28T12:36:49+5:30

Crime News: चोरी करण्यासाठी गेलेल्या चोराच्या मृत्यूची एक विचित्र घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ शेअर केला जात आहे. तसेच चोरी करताना या चोराचं डोकं आत आणि धड बाहेर राहीलं आणि त्याचा तडफडून मृत्यू झाला

 Scary! Head in, torso out; Thief trapped in the door and died in Varanasi | Crime News:  भयानक! डोकं आत, धड बाहेर; दरवाजात अडकून चोराचा तडफडून मृत्यू 

Crime News:  भयानक! डोकं आत, धड बाहेर; दरवाजात अडकून चोराचा तडफडून मृत्यू 

googlenewsNext

लखनौ - वाराणसीमध्ये चोरी करण्यासाठी गेलेल्या चोराच्या मृत्यूची एक विचित्र घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ शेअर केला जात आहे. तसेच चोरी करताना या चोराचं डोकं आत आणि धड बाहेर राहीलं आणि त्याचा तडफडून मृत्यू झाला, असा दावा केला जात आहे. हा धक्कादायक प्रकार वाराणसीमधील सारनाथ येथील दनियालपूर येथे घडला आहे.

सारनाथ पोलीस ठाणे परिसरातील दनियालपूर परिसामध्ये असलेल्या पॉवरलूम सेंटरच्या दरवाजात अडकून या चोराचा मृत्यू झाला. चोरीच्या इराद्याने पॉवरलूमध्ये घुसताना या चोराचं डोकं दरवाजात अडकलं असावं, त्यातून सुटका करताना तो तडफडून मृत्युमुखी पडला. 

दरम्यान, हा प्रकार पाहण्यासाठी घटनास्थळावर बघ्यांची गर्दी झाली आहे. हे पॉवरलूम निजाम नावाच्या व्यक्तीचं आहे. काम न मिळाल्याने हे पॉवर लूम २ दिवसांपासून बंद होते. या पॉवरलूमच्या दरवाजाच्या वरच्या बाजूला लॉक लागले होते. चोरीच्या इराद्याने आत घुसताना चोराने दरवाजा खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्याला यश आलं नाही. दरम्यान, त्याचं डोकं आत अडकलं आणि त्याचा मृत्यू झाला.  

मृत चोराची ओखळ जावेद अशी पटली आहे. तो पुराना पूल येथील रहिवासी आहे. तसेच त्याच्यावर आधीपासून चोरीचे अनेक आरोप आहेत.  

Web Title:  Scary! Head in, torso out; Thief trapped in the door and died in Varanasi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.