पाक आणि बांगलादेशचं राष्ट्रगीत पाठांतर करा, शाळेचा विद्यार्थ्यांना होमवर्क; पालक संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 10:01 AM2020-07-13T10:01:49+5:302020-07-13T10:20:20+5:30

भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते बाबूलाल मरांडी यांनी मुख्यमंत्री सी. हेमंत सोरेन यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे.

School asking students to learn Pakistan, Bangladesh national anthems in Jharkhand | पाक आणि बांगलादेशचं राष्ट्रगीत पाठांतर करा, शाळेचा विद्यार्थ्यांना होमवर्क; पालक संतापले

पाक आणि बांगलादेशचं राष्ट्रगीत पाठांतर करा, शाळेचा विद्यार्थ्यांना होमवर्क; पालक संतापले

Next
ठळक मुद्देबीडीओच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहेसमितीने अहवाल दिल्यानंतर शाळेविरोधात नियमानुसार कारवाई केली जाईल.घडलेल्या प्रकाराबद्दल शाळा व्यवस्थापनाने मागितली पालकांची माफी

घाटशिला - झारखंडमधील पूर्व सिंहभूम येथे असलेल्या घाटशिला येथील शाळेचा धक्कादायक प्रकार ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. इथल्या ऑनलाईन वर्गात विद्यार्थ्यांना एका प्रकल्पांतर्गत पाकिस्तान आणि बांगलादेशचे राष्ट्रगीत पाठांतर करण्यास सांगितलं आहे. ही माहिती कळताच पालकांनी याचा निषेध केला. तर भाजपाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि शाळेच्या व्यवस्थापनाविरोधात घाटशिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, व्यवस्थापनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपाने केली आहे.

भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते बाबूलाल मरांडी यांनी मुख्यमंत्री सी. हेमंत सोरेन यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे. शालेय जिल्हा शिक्षणाधिकारी शिवेंद्र कुमार म्हणाले की, शाळेला नोटीस पाठविण्यात आली आहे. उपायुक्त यांच्या आदेशानुसार बीडीओच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. समितीने अहवाल दिल्यानंतर शाळेविरोधात नियमानुसार कारवाई केली जाईल. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन संत नंदालाल शाळा व्यवस्थापनाने नोटीसद्वारे माहिती देऊन याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित सिंह यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने शाळा व्यवस्थापनाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार केली आहे. यासंदर्भात भाजपा व पालकांनी उपायुक्तांकडे तक्रारही केली आहे. भाजपाचे राज्य सरचिटणीस आदित्य साहू म्हणाले की, अशा शाळांमुळे राज्यातील मुलांचे भविष्य अंधारात आणि असुरक्षित आहे. असे गृहपाठ शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या देशविरोधी मानसिकतेचे प्रतिबिंबित करते असा आरोप त्यांनी केला.

शाळेचे स्पष्टीकरण

याबाबत स्पष्टीकरण देताना प्राचार्य संजय मल्लिक म्हणाले आहेत की, मुलांचे सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी भारताच्या शेजारी देशांच्या विषयावर एक प्रकल्प देण्यात आला होता. या अंतर्गत शेजारच्या देशांशी आणि त्यांच्या संस्कृतीशी संबंधित काही माहिती, राष्ट्रीय गाणी, राष्ट्रीय चिन्हे, फुले, प्राणी इत्यादींचा प्रयत्न केला जात होता. त्याचा इतर कोणताही उद्देश नव्हता. मात्र पालक आणि नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन हा प्रकल्प शाळा व्यवस्थापनाने रद्द केला आहे. जर घडलेल्या प्रकारामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या तर त्याबद्दल शाळा व्यवस्थापनाकडून आम्ही क्षमा मागतो अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केली आहे.

Web Title: School asking students to learn Pakistan, Bangladesh national anthems in Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.