शाळा बसचालकासह शिक्षकाकडून विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 11:08 AM2022-11-19T11:08:46+5:302022-11-19T11:13:37+5:30
Crime News: खासगी शाळा बसचालकाकडून विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याची घटना मुलुंडमध्ये घडली. तर विक्रोळीत खासगी शिकवणी दरम्यान शिक्षकाने विद्यार्थिनीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
मुंबई : खासगी शाळा बसचालकाकडून विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याची घटना मुलुंडमध्ये घडली. तर विक्रोळीत खासगी शिकवणी दरम्यान शिक्षकाने विद्यार्थिनीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
मुलुंड परिसरात ९ वर्षीय रेश्मा (नावात बदल) गुरुवारी सायंकाळी नवी मुंबई येथील शाळेतून खासगी बसमधून घरी येत असताना, चालक सूरज भालेराव (२६) याने रेश्माला अश्लील स्पर्श करण्यास सुरुवात केली. तिला याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या रेश्माकडे आईने चौकशी करताच तिने घडलेला प्रकार सांगितला. आईने थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, गुरुवारी रात्री उशिराने याप्रकरणी बस चालकाला अटक करण्यात आली आहे.
तर, दुसऱ्या प्रकरणात विक्रोळीतील १६ वर्षीय मुलीला शिक्षक चंद्रशेखर जोगू (२६) याने शिकवणीसाठी आर्याला बोलावून घेतले. शिकवणीला गेले तेव्हा तेथे अन्य विद्यार्थी दिसून आले नाहीत. आर्याने याबाबत विचारताच चंद्रशेखरने तिला जवळ ओढून तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.