पालिकेत नोकरी मिळविण्यासाठी त्याने दिला शाळेचा बनावट दाखला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 09:08 PM2019-02-19T21:08:55+5:302019-02-19T21:10:52+5:30
सध्या हा आरोपी न्यायालयीन कोठडीत शिक्षा भोगत आहेत.
मुंबई - आग्रीपाडा पोलिसांनी पालिकेच्या एका ५६ वर्षीय कर्मचाऱ्याला अटक केली आहे. बिजेंद्रसिंग वैद्य असं या आरोपीचं नाव आहे. बनावट शाळेचा दाखला देत पालिकेची नोकरी मिळवल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सध्या हा आरोपी न्यायालयीन कोठडीत शिक्षा भोगत आहेत.
उत्तरप्रदेशचा राहणारा बिजेंद्र वैद्य मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचारी पदासाठी १९८४ मध्ये अर्ज केला होता. त्यानुसार वैद्यला पालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कंत्राटी स्वरूपात नोकरीवर ठेवण्यात आले होते. १९८८ मध्ये वैद्यला पालिकेच्या सेवेत दाखल करून घेण्यात आलं. दरम्यान, सध्या वैद्य हा पालिकेच्या भायखळा येथील कस्तुरबा रुग्णालयात सफाई कामगार म्हणून कार्यरत होता.
३१ वर्षानंतर वैद्यला मुकादम या पदासाठी पदोन्नती आली. मात्र, पदोन्नती पूर्वी संबधित कर्मचाऱ्याच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. त्यानुसार वैद्यची कागदपत्रे पडताळणीसाठी पाठवण्यात आली होती. कागदपत्र पडताळणीत वैद्यनं जमा केलेला शाळेचा दाखला हा खोटा असल्याचं निदर्शनास आलं. त्यानुसार कस्तुरबा रुग्णालयाचे अधिष्ठाता चंद्रकात पवार यांनी खोटी कागदपत्रे सादर करून पालिकेची नोकरी मिळवल्याप्रकरणी वैद्य विरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. कस्तुरबा रुग्णालयाचे अधिष्ठाता चंद्रकात पवार यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्ह्याचा सखल तपास करून १२ फेब्रुवारी रोजी वैद्यवर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. न्यायालयानं त्याला १७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. रविवारी वैद्यला पोलिसांनी सुट्टीच्या न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.