१५ वर्षीय मुलासोबत शिक्षिकेचे संबंध, ३००० अश्लिल मेसेज; आईनं मोबाईल पाहिला अन्..

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 05:52 PM2022-11-18T17:52:47+5:302022-11-18T17:58:42+5:30

आरोपी एलन कॅडमेन स्मिथ ही ब्रिटनच्या इसले ऑफ वाईट येथे राहणारी आहे. ती २४ वर्षाची असून तिला १ वर्षाचा मुलगाही आहे.

school mentor Ellen Cadman-Smith sent a teenage pupil 3000 messages in two months | १५ वर्षीय मुलासोबत शिक्षिकेचे संबंध, ३००० अश्लिल मेसेज; आईनं मोबाईल पाहिला अन्..

१५ वर्षीय मुलासोबत शिक्षिकेचे संबंध, ३००० अश्लिल मेसेज; आईनं मोबाईल पाहिला अन्..

Next

मी तुझ्या प्रेमात वेडी झालीय, सतत तुझाच विचार माझ्या मनात असतो. कुठल्याही परिस्थितीत मला तू हवाय असं सांगत एका टॉप शाळेतील महिला शिक्षिकेने १५ वर्षाच्या मुलाला गेल्या ३ महिन्यात ३००० हून अश्लिल मेसेज पाठवले. माझं तुझ्यावर प्रेम आहे असं या महिलेने विद्यार्थ्याला सांगितले. या प्रकरणात महिलेवर कारवाई करण्यात आली असून सध्या प्रकरण कोर्टात सुनावणीसाठी आहे. 

ही घटना ब्रिटनमधील आहे. महिलेला मुलांसोबत काम करण्यास बंदी आणली आहे. आरोपी एलन कॅडमेन स्मिथ ही ब्रिटनच्या इसले ऑफ वाईट येथे राहणारी आहे. ती २४ वर्षाची असून तिला १ वर्षाचा मुलगाही आहे. कोर्टाच्या सुनावणीत महिलेने तिच्या बाजूने कुठलेही पुरावे सादर केले नाहीत. एलनचे पीडित मुलासोबत कनेक्शन होते. दोघंही कारमध्ये भेटायचे आणि शाळेत एकमेकांपासून दूर राहायचे. २०१७ रोजी आरोपी एलन प्रोग्रेस मेंटर म्हणून रुजू झाली होती. 

महिला विद्यार्थ्याला मेसेज करायची. सुरुवातीला दोघांमध्ये इमोशनल मेसेज शेअर व्हायचे. मग काही महिन्यांनी एलन कॅडमेन स्मिथने मुलाला सांगितले की, मी कायम तुझा विचार करत असते असं सांगत मेसेजला सुरुवात केली. सुनावणीवेळी महिला आणि मुलगा दोघेही लॉन्ग ड्राईव्हला गेल्याचं समोर आले. रिलेशनशिप वाढवण्यासाठी एलननं प्रेमाची कबुली दिली. पीडित मुलाच्या आईने एलनचे मेसेज वाचले. मुलाच्या मोबाईलमध्ये एलनचं नाव E नावानं सेव्ह केले होते. त्यानंतर आईने पोलिसांना फोन केला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

रिपोर्टनुसार, जेव्हा एलन कॅडमेन स्मिथ मुलासोबत चॅटिंग करत होती तेव्हा ती बॉयफ्रेंडसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ती १५ वर्षीय मुलाला बर्गर किंग आणि ड्रिंक्स घेऊन जायची. दोघांमध्ये शारिरीक संबंध झाले होते. त्यासाठी महिला जबाबदार होती असं कोर्टात न्यायाधीश म्हणाले. या महिलेने तिने केलेल्या कृत्यावर माफी मागण्यास नकार दिला. तिला मुलाशी माफी मागणार का असं विचारण्यात आले. तेव्हा ती काहीही बोलली नाही. 
 

Web Title: school mentor Ellen Cadman-Smith sent a teenage pupil 3000 messages in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.