संतापजनक! शाळेची फी न भरल्याने 10 वर्षीय मुलीला बेदम मारहाण; शिक्षकाने हातच मोडला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 10:05 AM2022-04-14T10:05:49+5:302022-04-14T10:08:04+5:30

शाळेतील शिक्षकाकडून विद्यार्थिनीला बेदम मारहाण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

school student 10 year old girl thrashed for not paying school fees teacher broke her hand | संतापजनक! शाळेची फी न भरल्याने 10 वर्षीय मुलीला बेदम मारहाण; शिक्षकाने हातच मोडला अन्...

संतापजनक! शाळेची फी न भरल्याने 10 वर्षीय मुलीला बेदम मारहाण; शिक्षकाने हातच मोडला अन्...

googlenewsNext

नवी दिल्ली - जयपूरमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एका शाळेत शाळा प्रशासनाचा अतिशय भयंकर प्रकार समोर आला आहे. आई-वडील वेळेत शाळेची फी भरू न शकल्याने शाळेतील शिक्षकाकडून विद्यार्थिनीला बेदम मारहाण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मारहाण झालेली विद्यार्थी 10 वर्षांची असून शिक्षकाने तिचा हातच मोडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 10 वर्षांच्या शिवानीच्या आई-वडिलांनी वेळेत शाळेची फी न भरल्याने शिक्षकाकडून धक्कादायक कृत्य करण्यात आलं आहे. संतापाच्या भरात शिक्षकाने मुलीला मारहाण केली. मारहाण इतक्या मोठ्या प्रमाणात करण्यात आली, की मुलीच्या हाताला दोन ठिकाणी फ्रॅक्चर झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षकाने आधी मुलीचा हात पिरगळला. मुलगी वेदनेने ओरडू लागल्याने तिला जमिनीवर पाडल्याची माहिती समोर आली आहे.

असह्य वेदनांमुळे शिवानीची तब्येत बिघडली. त्यानंतर तिच्या कुटुंबियांना शाळेत बोलवण्यात आलं. शिवानीने तिच्यासोबत नेमका काय प्रकार घडला याची माहिती आई-वडिलांना दिली. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिला रुग्णालयात नेलं. एक्सरे काढल्यानंतर रिपोर्टमध्ये मुलीच्या हाताला दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं. या संपूर्ण प्रकरणानंतर संतप्त नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Read in English

Web Title: school student 10 year old girl thrashed for not paying school fees teacher broke her hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.