येरवड्यात शाळकरी विद्यार्थ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 20:57 IST2019-01-04T20:57:19+5:302019-01-04T20:57:59+5:30
शाळकरी विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी येरवड्यात घडला.

येरवड्यात शाळकरी विद्यार्थ्याची आत्महत्या
पुणे (विमाननगर) : शाळकरी विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी येरवड्यात घडला. विवेक मनोज जाधव (वय १३ रा.जयप्रकाश नगर येरवडा) याने राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक हा येरवड्यातील गेनबा मोझे विद्यालयात आठवीत शिकत होता. गुरुवारी सकाळी आई कामाला गेल्यानंतर वडील दुसऱ्या खोलीत झोपले होते.विवेकने वरच्या खोलीत जाऊन ओढणीच्या साह्याने लोखंडी बारला गळफास घेतला.वडिलांनी उठल्यानंतर वरच्या खोलीचा बंद दरवाजा ठोठावला.काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडला.त्यावेळी विवेक गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला.उपचारापूर्वीच त्याचा म्रृत्यू झाल्याचे डाँक्टरांनी घोषित केले.विवेक हा आई वडील व लहान भावासोबत गेल्या सहा महिन्यांपासून जयप्रकाशनगर येथे भाड्याने राहत होता.आई वडील दोघेही सिक्युरिटीचे काम करतात. ११ डिसेंबर २०१८ पासून तो शाळेत आलेला नव्हता. त्याचा लहान भाऊ त्याच शाळेत शिकतो. तो आजारी असल्यामुळे शाळेत येत नव्हता अशी माहिती त्याच्या भावाने शिक्षकांना दिली होती. विवेक हा वर्गात हुशार होता. त्याने अचानक आत्महत्या कां केली याबाबत संभ्रम आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे.अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशिल बोबडे करत आहेत.