सायनमध्ये शाळकरी विद्यार्थिनीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 21:42 IST2019-06-11T21:41:07+5:302019-06-11T21:42:21+5:30
काळगी ही नुकतीच आठवी पास झाली होती

सायनमध्ये शाळकरी विद्यार्थिनीची आत्महत्या
मुंबई - सायन कोळीवाडा येथील एका १४ वर्षाच्या विद्यार्थिनीने गळफास लावून सोमवारी आत्महत्या केली. काळगी असे तिचे नाव असून तिच्या या कृत्यामागील नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याचे अॅण्टॉप हिल पोलिसांकडून सांगण्यात आले.
काळगी ही नुकतीच आठवी पास झाली होती, २००६ मध्ये काही महिन्याची असताना तिला अज्ञाताने कोळीवाड्यातील कारुमरियम्मन मंदिराच्या आवारात सोडून देण्यात आले होते. तिला मंदिराचे विश्वस्त पत्मादेवी यांनी दत्तक घेतले होते. त्या काही दिवसापूर्वी कामानिमित्य गावी गेल्या होत्या. सोमवारी काळगी हिला नाश्ता देण्यासाठी तिच्या खोलीत काहीजण गेल्या असता तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.