परीक्षेत नापास करण्याची धमकी देत शिक्षकांचा २ मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 12:56 PM2023-02-27T12:56:53+5:302023-02-27T12:57:53+5:30
बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, आरोपी शिक्षक फरार
भगवान वानखेडे
बुलढाणा - वासनांध शिक्षकाने आधी अश्लील चाळे केले, नंतर संधी मिळताच दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत आलटून-पालटून वारंवार लैंगिक अत्याचार केला. या सर्व प्रकाराला कंटाळून विद्यार्थ्यांनी ‘त्या’ वासनांध विज्ञान शिक्षकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात २६ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा तक्रार दिली. यावरुन पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
बुलढाणा तालुक्यातील एका नामांकित शाळेतील विज्ञान विषय शिकविणारा आरोपी शिक्षक धमेंद्र उत्तमराव हिवाळे याने दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार वारंवार घडत असल्याने दोन्ही विद्यार्थ्यांनी घडलेला प्रकार मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकांना सांगितला. यानंतर २६ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा पीडित विद्यार्थ्यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यानंतर शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शिक्षक फरार असून, तपास ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील करीत आहेत.
प्रात्याक्षिक परीक्षेत नापास करण्याची धमकी
पीडित असलेले दोन्ही विद्यार्थी अल्पवयीन असून, तर नात्याने सख्खे चुलत भाऊ आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांना आरोपी शिक्षक धमेंद्र हिवाळे हा दहावीच्या प्रात्याक्षिक परीक्षेत नापास करीन अशी धमकी देत वासनेचे शिकार बनवत होता. कधी शाळेच्या लॅबमध्ये, तर कधी अडगळीत ठिकाणी दोन्ही विद्यार्थ्यांना आलटून-पालटून बोलावून अश्लील कृत्य करीत असे.
सुटीच्या दिवशीही करीत होता अत्याचार
पीडित मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार, १८ फेब्रुवारीला महाशिवरात्रीची सुटी होती. वसतीगृहातील मुलांवर लक्ष ठेवण्याची दुसऱ्या शिक्षक असतानासुद्धा आरोपी धर्मेंद्र हिवाळे आला. पीडित विद्यार्थी दुपारी जेवणासाठी मेसकडे जात असताना आरोपी धर्मेंद्र हिवाळे याने मुलाला बोलावले व शाळेतील इमारतीमधीलमधील सायन्स लॅबमध्ये नेले. तिथे मुलाचे कपडे काढून त्याच्याशी अश्लील चाळे केले. २० फेब्रुवारी दुपारीसुद्धा तसाच प्रकार घडल्याचे मुलाने तक्रारीत म्हटले आहे.
मुख्यध्यापकांना सांगितली आपबिती
दोन्ही विद्यार्थ्यांसोबत आळीपाळीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी शिक्षक हिवाळे यास धडा शिकविण्यासाठी दोन्ही पीडित विद्यार्थ्यांनी ही बाब मुख्याध्यापकांना व फोनद्वारे घरच्यांना कळवली. अखेर २७ फेब्रुवारीच्या रात्री बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तक्रारीवरून धर्मेंद्र हिवाळे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.