१०० रुपयांसाठी मित्राच्या छातीत स्क्रू ड्रायव्हर खुसवला, भावाने बाईकवरून नेले हॉस्पिटलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 10:02 PM2022-03-22T22:02:03+5:302022-03-22T22:02:30+5:30
Crime News : चौकशीत सतीशने शंभर रुपयांवरून केलेल्या भांडणात हा जीवघेणा हल्ला केल्याचे सांगितले आहे. अटक आरोपीची चौकशी करून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कल्याणपुरी परिसरात अवघ्या 100 रुपयांसाठी एका तरुणाने मित्राच्या छातीत स्क्रू ड्रायव्हर भोसकल्याची घटना घडली आहे. तरुणाच्या छातीतून भळाभळा रक्त वाहू लागल्याने कुटुंबीयांनी त्याच्यासह रुग्णालयात धाव घेतली. प्रकृती बिघडल्याने त्यांना सफदरजंग रुग्णालयात रेफर करण्यात आले. पीडित प्रदीप (३४) याची रुग्णालयात प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपी सतीशवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. चौकशीत सतीशने शंभर रुपयांवरून केलेल्या भांडणात हा जीवघेणा हल्ला केल्याचे सांगितले आहे. अटक आरोपीची चौकशी करून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप आपल्या कुटुंबासह त्रिलोकपुरी चार ब्लॉकमध्ये राहतो. तो एका खासगी कंपनीत नोकरी करतो. त्यांच्या कुटुंबात मोठा भाऊ दीपक यांच्याशिवाय धाकटा भाऊ गोकुळ आहे. रविवारी रात्री उशिरा प्रदीप घराजवळ उभा होता. अचानक दिपकला भावाच्या रडण्याचा आवाज आला. तो धावत बाहेर आला तेव्हा प्रदीप हा टेंट हाऊसजवळ जमिनीवर जखमी अवस्थेत पडला होता. त्याच्या छातीतून रक्त वाहत होते.
सतीशने प्रदीपच्या छातीत स्क्रू ड्रायव्हर मारल्याचे लोकांनी सांगितले. दीपक आणि गोकुळ यांनी जखमी भावाला दुचाकीवरून जवळच्या एलबीएस रुग्णालयात नेले. तेथे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. त्याची चौकशी केल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.