सी लिंकचे साहित्य चोरणाऱ्या टोळीला अटक,१५ लाखाचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 05:36 PM2020-12-16T17:36:34+5:302020-12-16T17:37:49+5:30

Robber Gang Arrested : अल्युमिनियम आणि कॉपर केबलचा समावेश 

Sea link materials stealing gang arrested, Rs 15 lakh seized | सी लिंकचे साहित्य चोरणाऱ्या टोळीला अटक,१५ लाखाचा मुद्देमाल जप्त

सी लिंकचे साहित्य चोरणाऱ्या टोळीला अटक,१५ लाखाचा मुद्देमाल जप्त

Next
ठळक मुद्देया पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून ९ जणांच्या टोळीला अटक केली आहे. विनोद गौतम, रमेश यादव, भगवानदास कोरी, सचिन टेंभुर्णे, अब्दुल खान, मोहम्मद खान, आसिफ चौधरी, मैनुद्दीन खान, नेपाळी खान अशी त्यांची नावे आहेत.

नवी मुंबई - शिवडी न्हावाशेवा सी लिंकच्या पुलाचे साहित्य चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनीअटक केली आहे. त्यांच्याकडून १५ लाखाचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुलाच्या कामासाठी वापरले जाणारे महागडे अल्युमिनियम व कॉपरच्या केबल त्यांनी चोरी केल्या होत्या. 

 

पनवेल व उरण परिसरात सुरु असलेल्या शासकीय कामांच्या ठिकाणावरून साहित्य चोरीच्या घटना घडत होत्या. त्यात शिवडी न्हावाशेवा सी लिंक, रेल्वे पूल आदी कामांचा समावेश होता. सी लिंक च्या बांधकाम दर्जेदार व्हावे यासाठी लोखंड ऐवजी अल्युमिनियमच्या सळई वापरल्या जात आहेत. त्यानुसार हे महागडे अल्युमिनियम, कॉपर केबल, सेंटरिंग प्लेट असे साहित्य चिर्ले येथील गोडाऊनमध्ये साठवण्यात आले आहे. त्याठिकाणी पाळत ठेवून मागील बाजूच्या दलदलीच्या भागातून जाऊन हे तिथले साहित्य चोरी करायचे. त्यानंतर चोरलेल्या साहित्यांची भंगारात विक्री करायचे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने तपासाला सुरुवात केली होती. 

 

यादरम्यान पोलीस नाईक किरण राऊत व पोलीस शिपाई मेघनाथ पाटील यांना आरोपींची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक बनवण्यात आले होते. या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून ९ जणांच्या टोळीला अटक केली आहे. विनोद गौतम, रमेश यादव, भगवानदास कोरी, सचिन टेंभुर्णे, अब्दुल खान, मोहम्मद खान, आसिफ चौधरी, मैनुद्दीन खान, नेपाळी खान अशी त्यांची नावे आहेत. सर्वजण मुंबईसह नवी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे आहेत. त्यांनी यापूर्वी देखील वेगवेगळ्या महामार्गांच्या कामाचे, रेल्वे पुलाचे साहित्य चोरल्याचे समोर आले आहे. अशा सात गुन्ह्यांची उकल झाली असून १५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 

Web Title: Sea link materials stealing gang arrested, Rs 15 lakh seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.