मौलाना सादसंबंधित उत्तर प्रदेशातील बँक खाती केली सील
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 02:43 PM2020-05-09T14:43:54+5:302020-05-09T14:47:26+5:30
आतापर्यंत मौलाना साद आणि मरकझशी संबंधित लोकांची 32 बँक खाती समोर आली आहेत.
आयकर विभागाने निझामुद्दीनस्थित तबलिगी मरकझ प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आयकर विभागाने गुन्हे शाखेकडून काही कागदपत्रे मागितली होती. बँक खाती आणि पैशांच्या व्यवहाराची संपूर्ण माहिती गुन्हे शाखेने आयकर विभागाकडे दिली आहे. दिल्ली पोलीस आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) व्यतिरिक्त आयकर विभाग ही तिसरी एजन्सी बनली आहे, ज्याने मरकज प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. आतापर्यंत मौलाना साद आणि मरकझशी संबंधित लोकांची 32 बँक खाती समोर आली आहेत.
गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गुन्हे शाखेने सीबीआय, ईडी आणि आयकर विभागाला कळविले होते. या प्रकरणात ईडीने यापूर्वीच गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, मौलाना मोहम्मद साद आणि त्याच्या साथीदारांना उत्तर प्रदेशातील काही बँक खाती सापडली आहेत. या बँक खात्यांची संख्या 7 ते 8 असल्याचे सांगितले जाते. ही बँक खाती देखील सील करण्यात आल्याची माहिती उत्तर प्रदेशात मिळाली.
मौलाना साद यांचे दोन निकटवर्तीय क्राईम ब्रँचच्या रडारवर
Palghar Mob Lynching : पोलीस अधीक्षकांना पाठविले सक्तीच्या रजेवर
Coronavirus : खळबळजनक! आर्थर रोड कारागृहातील ७७ कैद्यांसह २६ पोलिसांना कोरोना
गुन्हे शाखेच्या तपासणीत मरकज आणि त्याच्या साथीदारांची 32 बँक खाती सापडली आहेत. मरकजचे मुख्य खाते लाल कुआन (जुनी दिल्ली) मधील बँक ऑफ बडोदा शाखेत आहे. या बँक खात्यातून मरकजकडे दररोज व्यवहार होत असत. या खात्यातून दररोज पैसे काढले आणि जमा केले जात. देणगी रूपात मरकज यांना दिलेली रक्कम या बँक खात्यात जमा झाली.
झाकीर नगर येथून कागदपत्रे जप्त केली
दुसरीकडे गुन्हे शाखेने जामिया नगरच्या जाकिर नगर (पश्चिम) येथे मरकज मॅनेजमेंटशी संबंधित व्यक्तीच्या घरावर छापा टाकला होता. या व्यक्तीच्या घरातून आर्थिक व्यवहारांशी संबंधित काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. झाकीर नगरमध्ये विचारपूस केल्यावर मौलाना साद यांच्या मुलाची चौकशी करण्यात आली. असे सांगितले जात आहे की, झाकीर नगर येथे राहणारी ही व्यक्ती जमातसाठी ये-जा करण्याची व्यवस्था करीत असे. रेल्वेच्या तिकिटांच्या बुकिंगसाठी युनिक आयडी आहे. असे किती लोक अजूनही लपून आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.