एकतर्फी प्रेमातून सुरक्षा रक्षक महिलेवर फेकलं ‘अ‍ॅसिड’

By चैतन्य जोशी | Published: October 13, 2022 10:40 PM2022-10-13T22:40:06+5:302022-10-13T22:40:41+5:30

वर्ध्यातील खळबळजनक घटना, मद्यपी आरोपीस ठोकल्या बेड्या

Security guard threw 'acid' on woman due to one-sided love | एकतर्फी प्रेमातून सुरक्षा रक्षक महिलेवर फेकलं ‘अ‍ॅसिड’

एकतर्फी प्रेमातून सुरक्षा रक्षक महिलेवर फेकलं ‘अ‍ॅसिड’

googlenewsNext

वर्धा: एकतर्फी प्रेमातून सुरक्षा रक्षकाने तिकिट काऊंटरवर बसणाऱ्या महिलेच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड सदृश दाहक पदार्थ फेकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना १३ ऑक्टोबर रोजी शहरातील मुख्य समजल्या जाणाऱ्या महावीर बालोद्यानात रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास घडली. हल्ल्यात महिलेची पाठ आणि हात काही प्रमाणात भाजल्याने तिच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी विकृत आरोपीस बेड्या ठोकल्या. अर्जून चाफले (५२) रा. असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

अजूर्न चाफले हा शहरातील महारवीर बालोद्यानात सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीवर होता. याच उद्यानात पीडिताही नोकरीवर होती. एकतर्फी प्रेमातून मद्यधूंद असलेल्या अर्जून चाफले याने उद्यानातच पीडितेच्या चेहऱ्यावर अॅसीड सदृश दाहक पदार्थ फेकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेने लगेच ओढणी समोर केल्याने सुदैवाने तिला मोठी इजा पोहचली नाही. पीडितेच्या हातावर आणि पाठीवर दाहक पदार्थ फेकल्या गेल्याने काही प्रमाणात तो भाग भाजला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पाहणी केली. रामनगर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी अर्जून चाफले यास अटक केली असून पीडितेवर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती दिली.

‘एसपीं’नी दिली भेट

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. एकतर्फी प्रेमातून आरोपीने प्रसाधनगृह स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अ‍ॅसिड सदृश दाहक पदार्थ आरोपीने महिलेवर फेकल्याचे सांगितले. तसेच सध्या महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असून तिच्यावर योग्यरित्या उपचार सुरु असल्याची माहिती ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: Security guard threw 'acid' on woman due to one-sided love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.