कुटुंब रुग्णालयात असल्याचे पाहून चोरट्यांनी डल्ला मारला, 8 लाखांचा ऐवज लंपास  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 01:02 PM2021-03-28T13:02:35+5:302021-03-28T13:03:35+5:30

याबाबत घटनास्थळावरून व पोलीस ठाण्यातून  मिळालेली माहिती अशी की, येथील मुख्य बाजारपेठेत सुधीर जाधव यांचे घर आहे. गेली काही दिवस ते इस्लामपूर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत

Seeing that the family was in the hospital, the thieves broke into the house and stole Rs 8 lakh | कुटुंब रुग्णालयात असल्याचे पाहून चोरट्यांनी डल्ला मारला, 8 लाखांचा ऐवज लंपास  

कुटुंब रुग्णालयात असल्याचे पाहून चोरट्यांनी डल्ला मारला, 8 लाखांचा ऐवज लंपास  

Next
ठळक मुद्देयाबाबत घटनास्थळावरून व पोलीस ठाण्यातून  मिळालेली माहिती अशी की, येथील मुख्य बाजारपेठेत सुधीर जाधव यांचे घर आहे. गेली काही दिवस ते इस्लामपूर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत

विकास शहा

शिराळा/सांगली : येथील गुरुवार पेठेतील सुधीर विश्वासराव जाधव यांच्या घरातील बावीस तोळे सोने, चांदी तसेच रोख पन्नास हजार रुपये असा आठ लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यानीचोरून नेल्याची घटना शुक्रवार २६ मार्च रोजीच्या सायंकाळी सहाच्या अगोदर घडली आहे. याबाबत आज शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

याबाबत घटनास्थळावरून व पोलीस ठाण्यातून  मिळालेली माहिती अशी की, येथील मुख्य बाजारपेठेत सुधीर जाधव यांचे घर आहे. गेली काही दिवस ते इस्लामपूर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. त्यांना शनिवार रोजी सुधीर जाधव यांना डिस्चार्ज मिळणार आहे म्हणून त्यांच्या पत्नी माया या पैसे नेण्यासाठी सायंकाळी सहाच्या दरम्यान घरी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी घर उघडले असता तिजोरी उघडी दिसली. कपाटातील दवाखान्याचे बिल भरण्यासाठी ठेवलेले रोख ५०  हजार रुपये, सोन्याच्या बांगड्या , मंगळसूत्र, गंठण, अंगठी, चेन आदी जवळपास बावीस तोळे सोने तसेच ८० ग्रॅम चांदीचे दागिने असा अंदाजे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे लक्षात आले. यावेळी तातडीने पोलिसांना कळविले असता पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लवार , पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर , कालिदास गावडे, शिवाजी पाटील , महेश साळुंखे , विनोद पाटील , रणजित ठोमके यांनी घटनास्थळी भेट घेतली.

सुधीर जाधव यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर घरी आले असता त्यांना नेमके काय चोरीस गेले याची माहिती मिळाली. त्यानुसार माया जाधव यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली असून तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर हे करीत आहेत. रात्री ८ च्या दरम्यान श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना बोलविण्यात आले.श्वानपथक घर आणि अंगण याच ठिकाणी घुटमळले. तिजोरीची चावी बेडवरील गादी खाली ठेवली होती ती चावी घेऊन कपाटातील ऐवज व रक्कम चोरट्याने चोरली आहे
 

Web Title: Seeing that the family was in the hospital, the thieves broke into the house and stole Rs 8 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.