सीमा हैदर सचिनसोबत नोएडाहूनही होणार होती फरार, पण एक चूक घढली अन्..; पोलिसांनी केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 09:15 PM2023-07-18T21:15:33+5:302023-07-18T21:16:24+5:30
Seema Haider : उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने सोमवारी सीमाची कसून चौकशी केली.
नवी दिल्ली - पाकिस्तानी तरुणी सीमा हैदरला (Seema Haider) अटक होण्याची भीती होती. ती तिची ४ मुले आणि प्रियकर सचिन मीणासह फरार होण्याच्या तयारीत होती. नोएडा पोलिसांशी संबंधित सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली.
सीमा हैदर व्हिसाशिवाय बेकायदेशीरपणे भारतात आली आहे. ती तिचा प्रियकर सचिन मीणासोबत राहत होती. 2019 मध्ये ऑनलाइन गेम (PUBG) खेळताना यांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर कथित प्रेम झाले. उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने सोमवारी सीमाची कसून चौकशी केली. तसेच, दुसऱ्याबाजूला पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने अटक होण्याच्या भीतीने फरार होण्याचा प्लॅनही आखला होता.
नोएडा पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, सीमाने म्हटले आहे की, "तिला भारताचा व्हिसा न मिळाल्याने ती ती नेपाळला गेली आणि तिथून बसने नवी दिल्लीला आली. ती 13 मे रोजी तिच्या 4 मुलांसह यमुना एक्सप्रेसवेवर पोहोचली, तेथे सचिन तिची वाट पाहत होता. त्याने त्यांना ग्रेटर नोएडा येथील मोहल्ला आंबेडकर नगर येथे भाड्याच्या घरी नेले." बेकायदेशीरपणे स्थलांतरितांना आश्रय दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन मीनाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याने सीमाची त्याच्या वडिलांशी ओळख करून दिली आणि तिच्याशी लग्न करण्याचा आपला इरादा असल्याचेही सांगितले होते.
'सीमाने भारतीय जीवनपद्धतीचा स्वीकारली तर लग्न' -
जर सीमाने भारतीय जीवनपद्धतीचा स्वीक केला, तर लग्नाची परवानगी देईन, असे सचिनच्या वडिलांनी म्हणाले होते. यावर, सीमाही राजी झाली होती. यानंतर सचिनही आपल्या घरी गेला होता. यानंतर, काही दिवसांनी तो आणि त्याचे वडील पुन्हा परत आले. त्यांनी तीला कोर्ट मॅरेजसाठी बुलंदशह येथे कोर्टात नेले होते. यावेळी सीमाने त्यांना तिची कागदपत्रे दाखवली. यावर आपले सचिनसोबत लग्न होऊ शकत नाही कारण आपण भारतीय नागरिक नाही, असे वकिलाने सीमाला सांगितले.
सीमा फरार होण्याच्या विचारात होती, पण...
वकिलाला भेटल्यानंतर सीमाला तिच्या मुलांसह दुसऱ्या ठिकाणी जायचे होते. कारण वकील पोलिसांना माहिती देईल आणि पोलिस आपल्याला अटक करतील, हे तिला माहीत होते. यासंदर्भात तिने पोलिसांना सांगितले की, 'आम्ही भाड्याचे घर त्वरित सोडले, आमची दिल्लीला जाण्याची इच्छा होती. आम्ही सचिनच्या वडिलांकडून पैसेही घेतले होते, मात्र पोलीस तेथे पोहोचले आणि त्यांनी आम्हाला अटक केली.'