खळबळजनक! प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले; १३ वर्षीय मुलीने केली लहान बहिणीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 07:20 AM2023-05-25T07:20:02+5:302023-05-25T07:20:26+5:30

आई-वडील घरी नसताना तो घरी जात होता. १४ मे रोजी बालिकेने दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते.

Seen in an offensive state with a lover; A 13-year-old girl killed her 9-year-old sister | खळबळजनक! प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले; १३ वर्षीय मुलीने केली लहान बहिणीची हत्या

खळबळजनक! प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले; १३ वर्षीय मुलीने केली लहान बहिणीची हत्या

googlenewsNext

- एस. पी. सिन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा : बिहारच्या वैशाली जिल्ह्यात १३ वर्षीय मुलीने नऊ वर्षीय बहिणीची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आपल्याला प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहणारी चौथीत शिकणारी लहान बहीण आपल्या आई-वडिलांना हा प्रकार सांगेल, या भीतिपोटी मोठ्या बहिणीने प्रियकराच्या साथीने हे  कृत्य केले. 

लहान बहिणीची हत्या केल्यानंतर मृतदेह चार दिवस एका बॉक्समध्ये बंद करून ठेवला. मृतदेहाची दुर्गंधी येऊ लागली, तेव्हा मृतदेहाचे अनेक तुकडे केले व ॲसिडने जाळून टाकत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.    

१६ मे रोजी नऊ वर्षीय बालिका बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. १९ मे रोजी बालिकेचा मृतदेह घरामागील झाडीमध्ये आढळला. तिच्या मोठ्या बहिणीचे मागील दोन महिन्यांपासून एकासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. आई-वडील घरी नसताना तो घरी जात होता. १४ मे रोजी बालिकेने दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. त्या दिवशी बालिकेचे आई-वडील विवाह समारंभात गेले होते. १५ मे रोजी बालिकेला तिची मोठी बहीण, तिचा प्रियकर व त्याच्या काकूने ठार केले. तीन दिवसांनी मृतदेह बाहेर काढून चेहऱ्यावर ॲसिड टाकले. त्यानंतर, मोठ्या बहिणीने लहान बहिणीच्या मृतदेहाची अनेक बोटे कापली. मृतदेह घराच्या मागील बाजूस फेकला.

गुन्ह्याची कबुली : पोलिसांचा तपास, एफएसएलचा अहवाल व श्वानपथकाच्या मदतीने या हत्याकांडाची उकल करण्यात पोलिसांना यश आले. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तिघांनीही गुन्हा कबूल केला आहे.

Web Title: Seen in an offensive state with a lover; A 13-year-old girl killed her 9-year-old sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.