रिक्षात राहिलेले प्रवाशाचे लग्नाचे दागिने  घेऊन गावी पळालेल्या रिक्षाचालकाकडून मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 09:54 PM2021-01-23T21:54:32+5:302021-01-23T21:55:45+5:30

Crime News : मुलीच्या लग्नासाठी सभागृहात जाताना रिक्षात विसरलेल्या प्रवाश्याचे दागिने व कपडे नवघर पोलिसांनी महिन्याभराच्या तपासानंतर परत मिळवून दिले .

Seizure of golds from the rickshaw driver who fled to the village carrying the wedding jewelery of the passenger in the rickshaw | रिक्षात राहिलेले प्रवाशाचे लग्नाचे दागिने  घेऊन गावी पळालेल्या रिक्षाचालकाकडून मुद्देमाल जप्त

रिक्षात राहिलेले प्रवाशाचे लग्नाचे दागिने  घेऊन गावी पळालेल्या रिक्षाचालकाकडून मुद्देमाल जप्त

googlenewsNext

 मीरारोड - मुलीच्या लग्नासाठी सभागृहात जाताना रिक्षात विसरलेल्या प्रवाश्याचे दागिने व कपडे नवघर पोलिसांनी महिन्याभराच्या तपासा नंतर परत मिळवून दिले . रिक्षाचालकाने दागिने व कपडे थेट आपल्या उत्तर प्रदेश येथील गावी नेऊन ठेवले होते.

भाईंदर पूर्वेच्या कस्तुरी पार्क मध्ये राहणारे तुकाराम कदम यांच्या मुलीचे जेसलपार्क येथील सभागृहात ११ डिसेम्बर रोजी लग्न होते . सकाळी त्यांच्या पत्नी ह्या अडीच लाखांचे दागिने व कपडे घेऊन रिक्षातून पोहचल्या . परंतु घाई गडबडीत उतरताना दागिने व कपड्यांची पिशवी रिक्षातच राहिली .

दागिने व कपडे रिक्षात राहिल्याचे लक्षात आल्यावर नवघर पोलिसात या बाबत फिर्याद दिली होती . पोलीस निरीक्षक संपत पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे सह भालेराव , शिंदे जाधव यांच्या पथकाने तपास सुरु केला .

पोलिसांनी आधी त्या रिक्षाचा क्रमांक शोधून काढला . त्या आधारे रिक्षा मालकाला गाठून चौकशी केली असता त्याने सदर रिक्षा हि मूळचा उत्तर प्रदेशचा पण काशीमीरा येथे राहणारा रिक्षा चालक मोहम्मद मकसूद अली ह्याला चालवण्यास दिल्याचे सांगितले .

पोलिसांनी मकसूदच्या घरी तपासणी केली असता तो त्याच्या उत्तर प्रदेश येथील मूळ गावी गेला होता . पोलिसांना ११ जानेवारी रोजी मकसूद हा गावा वरून आल्याचे समजताच त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली . अखेर रिक्षात दागिने व कपड्यांची सापडलेली ती पिशवी आपण मूळगावी नेऊन ठेवल्याचे त्याने कबूल केले .

पोलिसांनी त्याला मूळ गावा वरून दागिने व कपड्यांची पिशवी आणायला लावली . २० जानेवारी रोजी कदम यांचे दागिने व कपडे पोलिसांच्या ताब्यात आले . नवघर पोलिसांनी लग्ना वेळी गेलेले दागिने महिन्या भरा नंतर कदम कुटुंबियांना मिळवून दिल्या बद्दल कटुक होत आहे . परंतु पोलिसांनी मकसूद वर मात्र केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


 

Web Title: Seizure of golds from the rickshaw driver who fled to the village carrying the wedding jewelery of the passenger in the rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.