सेल्फी पॉइन्ट आगीत जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 22:07 IST2019-12-22T22:05:40+5:302019-12-22T22:07:19+5:30

हा सेल्फी पॉइंट जाळण्यात आला असावा असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

Selfie point burns with fire | सेल्फी पॉइन्ट आगीत जळून खाक

सेल्फी पॉइन्ट आगीत जळून खाक

ठळक मुद्देया सेल्फी पॉइंटचा उद्घाटन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी पावणे सात वाजता सेल्फी पॉइंटला कोणीतरी अज्ञात इसमाने आग लावली

डोंबिवली - कल्याण डोंबिवली महापालिकेने स्वच्छ व सुंदर डोंबिवली उपक्रमांतर्गत 2016 मध्ये कल्याण - डोंबिवली समांतर रस्त्यावर सेल्फी पॉइंट उभारला होता. या सेल्फी पॉइंटचा उद्घाटन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी पावणे सात वाजता सेल्फी पॉइंटला कोणीतरी अज्ञात इसमाने आग लावल्याने हा सेल्फी पॉइंट आगीत जळून खाक झाला आहे. या रस्त्यावर नवीन हॉटेल्स् उघडली आहेत. तसेच या रस्त्याच्या एका बाजूला प्रेमीयुगल आणि टवाळखोर मुले उभे असतात. यांच्याकडूनच हा सेल्फी पॉइंट जाळण्यात आला असावा असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

Web Title: Selfie point burns with fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.