घरी परतत असताना डंपरच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 19:25 IST2020-01-14T19:23:20+5:302020-01-14T19:25:03+5:30
याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल

घरी परतत असताना डंपरच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
ठळक मुद्देसोनारपाडा येथे रस्ता ओलांडणाऱ्या ठाकुर यांना डंपरने धडक दिल्याची घटना आज दुपारी १२.५५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत ठाकुर यांचा जागीच मृत्यू झाला.
डोंबिवली - सोनारपाडा परिसरात राहणारे मुकुंद दामा ठाकुर (७८) मंगळवारी दुपारी खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. खरेदी केल्यानंतर घरी परतत असताना सोनारपाडा येथे रस्ता ओलांडणाऱ्या ठाकुर यांना डंपरने धडक दिल्याची घटना आज दुपारी १२.५५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत ठाकुर यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच घटनेनंतर डंपरचालक पळुन गेला. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु केला आहे.