साठी ओलांडलेला 'तरुण' सोशल मीडियावर चाईल्ड पॉर्न करत होता वायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 04:09 PM2019-11-24T16:09:21+5:302019-11-24T19:34:00+5:30

चाईल्ड पॉर्न शेअर करणाऱ्या ६ जणांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे.

Senior citizen posted child porn on the name of 19 years facebook account | साठी ओलांडलेला 'तरुण' सोशल मीडियावर चाईल्ड पॉर्न करत होता वायरल 

साठी ओलांडलेला 'तरुण' सोशल मीडियावर चाईल्ड पॉर्न करत होता वायरल 

Next
ठळक मुद्दे फेसबुकवर १९ वर्षीय तरुणाचे प्रोफाइल बनवले आणि त्या फेसबुक प्रोफाइलवरून पॉर्न शेअर करत असे. हा ६१ वर्षीय आरोपी पूर्वी रेडक्रॉसमध्ये काम करत होता.


नवी दिल्ली - सोशल मीडियावर चाईल्ड पॉर्न शेअर करणाऱ्या ६ जणांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. या ६ जणांना अमेरिकेच्या एका एजन्सी आणि नॅशनल क्राईम ब्युरोच्या सूचनेच्या आधारे बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. अटक केलेल्या आरोपींमध्ये एक ६१ वर्षीय व्यक्ती देखील असून तो किराणा मालाचे दुकान चालवतो. त्याने फेसबुकवर १९ वर्षीय तरुणाचे प्रोफाइल बनवले आणि त्या फेसबुक प्रोफाइलवरून पॉर्न शेअर करत असे. हा ६१ वर्षीय आरोपी पूर्वी रेडक्रॉसमध्ये काम करत होता.

संजू राठोड (२५), अमित मंडल (२४), नरेंद्र कुमार (२२), रेवती नंदन आनंद (३४), लोकराज यजुर्वेदी (६१) आणि सुदामा राम (२९) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे आरोपी चाईल्ड पॉर्न डाऊनलोड करत आणि सोशल मीडियावर ते वायरल करत असत. चौकशीदरम्यान ६१ वर्षीय लोकराजने सांगितले की, व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून मिळालेले अश्लील कन्टेन्ट मी अपलोड केला होता. नरेंद्र हा आरोपी इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत असून संजू आजाद पूर बाजारमध्ये मजदूर म्हणून काम करतो. अमित हा आरोपी गुडगाव येथील एका ऑटोमोबाईल कंपनीत काम करतो. त्याशिवाय आरोपी सुदाम हा शिंप्याचे काम करते. दरम्यान, नॅशनल क्राईम ब्युरो आणि अमेरिकेच्या एजेन्सी यांच्यात लहान मुलांच्या शोषणाबाबत कारवाई करण्यासाठी करार झाला होता. या करारानुसार अमेरिकेची एजन्सी चाईल्ड पॉर्न डाऊनलोड आणि अपलोड करण्याबाबत माहिती देते. त्याशिवाय सोशल मीडियाच्या साईट्सने देखील अशी माहिती शेअर करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आपापली पावलं उचलली आहेत. 

Web Title: Senior citizen posted child porn on the name of 19 years facebook account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.